लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर गुरुवारी एका तासाचा वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (एमएसआरडीसी) हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टमअंतर्गत मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर किमी ६.००० येथे पुणे – मुंबई (मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवर) गॅन्ट्री बसविण्याचे काम गुरुवारी करण्यात येणार आहे. या कामासाठी दुपारी १२ ते १ या वेळेत वाहतूक ब्लॉक घेण्यात आला आहे. या कालावधीत मुंबई वाहिनीवरील सर्व प्रकारच्या हलक्या व जड अवजड वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद करण्यात येणार आहे. वाहनधारकांना पर्यायी मार्गाने प्रवास करता येईल.

आणखी वाचा-कोकण रेल्वेत दर दिवशी विनातिकीट प्रवाशांकडून नऊ लाख रुपये दंड वसूल

पर्यायी मार्ग असे…

  • यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून पुणे – मुंबई वाहिनीवरील (पुण्याहून मुंबईकडे येणारी) हलकी वाहने मुंबई वाहिनीवर लेन किमी ५५.००० वरून वळवून मुंबई – पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ या जुना मुंबई – पुणे मार्गावरून जाता येईल.
  • यशवंतराव चव्हाण मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावरून पुणे – मुंबई वाहिनीवरील (पुण्याहून मुंबईकडे येणारी) हलकी वाहने व बसेस खोपोली एक्झीट किमी ३९.००० येथून वळवून राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ जुना पुणे – मुंबई महामार्गावरून खोपोली शहरातून पुढे शेडूंग टोल नाका मार्ग मुंबई वाहिनीवरून मार्गस्थ करण्यात येतील.
  • यशवंतराव चव्हाण मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावरून पुणे – मुंबई वाहिनीवरील (पुण्याहून मुंबईकडे येणारी) हलकी व जड-अवजड वाहने खालापूर टोल नाका, शेवटच्या लेनने खालापूर एक्झीट किमी ३२.००० येथून वळवून राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ जुना पुणे – मुंबई महामार्गावरून खोपोली शहरातून पुढे शेडुंग टोल नाका मार्ग मुंबई वाहिनीवरून मार्गस्थ करण्यात येतील.
  • यशवंतराव चव्हाण मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावरून पुणे ते मुंबई वाहिनीवरील (पुण्याहून मुंबईकडे येणारी) हलकी व जड-अवजड वाहने पनवेल क्र. ४८ या मार्गावरून पनवेल मार्ग मुंबई दिशेने मार्गस्थ करण्यात येतील.
  • मुंबई – पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ या मार्गावरून पुणे येथून मुंबईला जाणारी वाहने शेडुंग फाट्यावरून सरळ पनवेल दिशेने मार्गस्थ करण्यात येतील.
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One hour traffic block on thursday for installation of gantry on mumbai pune expressway mumbai print news mj