पश्चिम रेल्वेच्या विरार-दादर उपनगरी गाडीच्या टपावरून प्रवास करणारा एक तरूण ओव्हरहेड वायरचा स्पर्श होऊन गंभीर जखमी झाला. यावेळी झालेल्या छोटय़ा स्फोटामुळे मंगळवारी सकाळी दादर स्थानकामध्ये घबराट पसरली होती.
सकाळी ११.२० वाजता विरारहून दादरला येणाऱ्या गाडीच्या टपावरून प्रेमसिंग ठाकूर हा दहिसरचा २१ वर्षीय तरूण प्रवास करत होता.
गाडीतील अन्य प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमसिंग अंधेरीला टपावर चढला होता. दादर येथे खाली उतरताना त्याचा हात ओव्हरहेड वायरला लागला आणि एक स्फोट होऊन तो खाली फेकला गेला. स्फोटाचा आवाज आल्यावर दादर स्थानकात घबराट पसरली आणि प्रवाशांची पळापळ झाली. प्रेमसिंग गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा