छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) स्थानकावरुन अंबरनाथला चाललेल्या लोकलमध्ये नाहूर स्टेशनजवळ झालेल्या गोळीबारात तबरेज जेठवा हा पवासी झखमी झाला आहे. गोळीबार करणारे चौघेजण फरार झाले आहेत. ही घटना काल (शुक्रवारी) रात्री अकराच्या सुमारास घडली.
एका बिल्डरकडे ड्रायव्हरची नोकरी करणारा तबरेज रात्री अंबरनाथ लोकलमध्ये मालडब्यात बसला. याच डब्यात बसलेल्या अन्य चारजणांशी वाद झाला. त्यानंतर चौघांनी तबरेजवर गोळ्या झाडल्या. त्यातील दोन गोळ्या तबरेजला लागल्याने ते जखमी झाले आहेत.गोळीबार करणारे नाहूर स्थानकावर उतरले आणि फरार झाले.
जखमी तबरेजला आधी मुलुंड येथील अगरवाल रुग्णालयामध्ये नेण्यात आले. नंतर त्याला सायन येथील रुग्णालयामध्ये हलवण्यात आले. सध्या तबरेजवर उपचार सुरू आहेत. रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.