कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी ज्योती कांबळे या ३२ वर्षीय तरुणीला मुंबईत गुरुवारी ताब्यात घेण्यात आले. सनातन या संघटनेशी संबंधित समीर गायकवाड या तरुणाला सांगलीत पानसरे यांच्या हत्येतील सहभागाच्या संशयावरून बुधवारी अटक करण्यात आली. यानंतर पोलिसांनी या प्रकरणी तातडीने मुंबईतही कारवाई केली आहे.

ज्योती कांबळे या तरुणीला कांजुरमार्ग या उपनगरातून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. तिला सांगलीला नेण्यात आले आहे. ज्योतीचे सनातन संघटनेशी जवळचे संबंध आहेत, दूरध्वनी तपशिलावरून ती समीर गायकवाड याच्याशी सतत संपर्कात होती, असाही पोलिसांचा संशय असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योतीचे मोबाइल दुरुस्तीचे दुकान होते. ती बरीच वर्षे सनातन संघटनेसाठी काम करीत आहे.

Story img Loader