डेंग्यूमुळे आणखी एका तरुणीला प्राण गमावावा लागला आहे. परळ येथे राहणाऱ्या पूनम गुप्ता (२४) या तरुणीला अत्यवस्थ अवस्थेत केईएम रुग्णालयात १९ सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आले. तिला डेंग्यू झाल्याचे निदान झाले होते. २० सप्टेंबर रोजी रक्तदाब वाढल्याने हृदयक्रिया बंद पडून तिचा मृत्यू झाला.
 गेल्या दोन महिन्यात डेंग्यूचा हा सहावा मृत्यू आहे. भायंदर येथे राहणाऱ्या सर्वेश यादव (१७) या तरुणाचे २३ सप्टेंबर रोजी केईएम रुग्णालयात निधन झाले. त्यालाही डेंग्यू झाला होता.  दरम्यान, पालिकेने डेंग्यूविरोधातील मोहीम अधिक तीव्र केली असून त्यासाठी एनएसएसच्या विद्यार्थ्यांची मदत घेण्यात येत आहे. शाळांमध्ये जाऊनही डेंग्यूविषयी माहिती देण्यात येणार आहे. त्याव्यतिरिक्त दर शनिवार रविवारी भरवण्यात येत असलेल्या आरोग्य शिबिरांची व्याप्तीही वाढवण्यात येत आहे.

Story img Loader