बोरिवली पूर्व येथून नायट्राझेपमच्या ७५०० गोळ्या जप्त केल्यानंतर अंमलीपदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) याप्रकणी ४७ वर्षीय व्यक्तीला शुक्रवारी अटक केली. नायट्राझेपमबाबत मुंबईतील ही सर्वात मोठी कारवाई आहे. यापूर्वी याप्रकरणी एकाला अटक केली होती.

हेही वाचा- उमेदवारी अर्ज दाखल ; ऋतुजा लटके, मुरजी पटेल यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

Police arrest one for black marketing commercial gas Pune news
व्यावसायिक गॅसचा काळाबाजार उघड; पोलिसांकडून सिलिंडरच्या ७२ टाक्या जप्त, एकाला अटक
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Mokka crime fugitive arrested from Karnatak Pune news
Pune Crime News: मोक्काच्या गुन्ह्यातील फरारीला कर्नाटकातून अटक
nia raided Chayanagar Amravati and detained suspected youth for questioning
‘एनआयए’ची अमरावतीत छापेमारी; संशयित युवक ताब्यात, पाकिस्तान कनेक्शन….
Six people arrested for smuggling gold worth Rs 10 crore Mumbai news
दहा कोटींच्या सोन्याच्या तस्करीत सहा जणांना अटक; तीन आरोपी विमानतळावरील कर्मचारी
Mumbai, gold, silver , Accused arrested with gold,
मुंबई : १९ कोटींच्या सोन्या, चांदीसह आरोपीला अटक
kidnap of uncle of MLA Yogesh Tilekar, Yogesh Tilekar uncle, Yogesh Tilekar latest news,
आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण, पोलिसांकडून अपहरणकर्त्यांचा शोध
villagers rescue accused as well as cop falls into well In sangamner taluka
पुढे आरोपी, मागे पोलीस पाठलागाचा थरार ! आरोपी पाठोपाठ पोलीसही पडला विहिरीत

एनसीबीला मिळालेल्या विशेष माहितीच्या आधारे बोरिवली पूर्व येथील नॅशनल पार्क जवळील एका ट्रॅव्हल्सच्या कार्यालयात ५ ऑक्टोबर रोजी शोधमोहिम राबवण्यात आली. तेथून ७५०० नायट्राझेपमच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या. तपासणीत त्यांचे वजन साडेचार किलो असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी संशयीत शेखला एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. त्यानंतर याप्रकरणी नुरूद्दीन अहमद शेख (३७) याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता शुक्रवारी याप्रकरणी जोगेश्वरी पूर्व येथील रहिवासी अब्दुल खालीद मलिक शेख (४७) याला अटक करण्यात आली. खालीद या प्रकरणातील प्रमुख आरोपींपैकी एक आहे. याप्रकणातील मुख्य आरोपीच्या तो संपर्कात होता. त्याच्या सांगण्यावरून प्रतिबंधित गोळ्यांचे तो वितरण करीत होता. याप्रकरणी एनसीबी अधिक तपास करीत आहे.

हेही वाचा- वैद्यकीय शिक्षण प्रवेशाच्या नावाखाली दोन कोटींची फसवणूक; एकाला अटक

गेल्या काही वर्षांमध्ये नायट्राझेपम गोळ्यांच्या मागणीत खूपच वाढ झाली आहे. विशेष नायट्राझेपम गोळ्यांनी दारू आणि गांजाची जागा घेतली आहे. त्या एलएसडी आणि एमडीएमएपेक्षा खूपच स्वस्त आहेत. त्यामुळे तरूण मोठ्या प्रमाणात त्याचे व्यसन करीत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. बेंझोडायझेपिन औषधांच्या श्रेणीअंतर्गत येणाऱ्या या गोळ्या चिंता, निद्रानाश आणि दारूचे व्यसन सोडवण्यासाठी वापरल्या जातात. पण नायट्राझेपामचा सतत गैरवापर केल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्याामुळे मृत्युही होऊ शकतो. या गोळीचा १० रुपये दर आहे. पण तस्कर काळ्याबाजारात ५० ते १०० रुपयांना एक गोळी विकतात, असेही सूत्रांनी सांगितले.

Story img Loader