वांद्रे वरळी सागरी सेतूनवरून आत्महत्या करण्याचे सत्र सुरूच आहे. मंगळवारी संध्याकाळी टॅक्सीतून आलेल्या एका तरुणाने सागरी सेतूवरून उडी मारून आत्महत्या केली. त्याची ओळख पटली नसून रात्री उशिरापर्यंत त्याचा मृतदेह शोधण्याचे काम सुरू होते.
तिशीतल्या एका तरुणाने वरळी येथून टॅक्सी वांद्रेला जाण्यासाठी टॅक्सी केली होती. त्याने निळी जिन्स आणि पांढरा शर्ट घातला होता.
सुमारे तीन किलोमीटरचे अंतर गेल्यानंतर त्याने ही टॅक्सी थांबवली आणि सागरी सेतूवर चढून उडी मारून आत्महत्या केली.  या टॅक्सीचालकाने कुणालाच या घटनेची माहिती न देता तिथून पळ काढला. काही प्रवाशांनी दुरून हा प्रकार पाहिल्यानंतर त्यांनी टोल प्लाझाच्या सुरक्षा रक्षकांना माहिती दिली. पोलिसांना माहिती न देता निघून गेलेल्या त्या टॅक्सीचालकाचाही याप्रकरणी शोध घेत असल्याची माहिती परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त एस. जयकुमार यांनी दिली. सागरी सेतूवरून उडी मारून आत्महत्या करण्याची या वर्षांतली ही दुसरी घटना आहे.  एका महिलेला आत्महत्या करण्यापासून सुरक्षा रक्षकांनी रोखले होते.

Story img Loader