अंधेरी येथील लिंक रोडवरील एका उत्तुंग इमारतीच्या सहाव्या मजल्यावर मंगळवारी रात्री एकच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत होरपळून महिंद्र कौर (८०) या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला असून अन्य एक जण जखमी झाला आहे.
अंधेरी (प.) येथील लिंक रोडवरील धीरज-गौरव या १२ मजली इमारतीच्या सहाव्या मजल्यावर मंगळवारी मध्यरात्री भीषण आग लागली. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी रवाना झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अवघ्या अध्र्या तासात आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीत महिंद्र यांचा मृत्यू झाला तर शैलेश सिंग (४४) हे गंभीर जखमी झाले. आगीचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

Story img Loader