कांदिवली पूर्व येथे कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसाच्या हाताचा चावा घेतल्याप्रकरणी समता नगर पोलिसांनी ३६ वर्षीय तरूणाला अटक केली. कांदिवली पूर्व येथील आकुर्ली रोड येथे एक व्यक्ती जखमी असल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली होती. याबाबतची माहिती स्थानिक समता नगर पोलीस ठाण्याला देण्यात आली. त्यानंतर तात्काळ पोलिसांचे एक पथक ठाकूर हाऊस येथील घटनास्थळी दाखल झाले. जखमी व्यक्ती रामप्रकाश शोभनाथ तिवारी (३६) याला शताब्दी रुग्णालयात घेऊन जाण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

त्यावेळी तिवारी आरडाओरडा करू लागला. त्याला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांना त्याने शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. तसेच पोलीस हवालदार राजेंंद्र नलावडे यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला तिवारीने जोरदार चावा घेतला. त्यामुळे नलावडे यांच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाले.
याप्रकरणी तिवारीला रुग्णालात दाखल करून उपचार करण्यात आले.

हेही वाचा : सिद्धार्थ नगर पुनर्विकास : घरभाड्याच्या रक्कमेचा प्रश्न अखेर निकाली, दर महिन्याला १८ हजारऐवजी आता २५ हजार घरभाडे मिळणार

त्यानंतर पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून तिवारीला अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. आरोपीविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, धमकावणे, मारहाण करणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी पोलीस मोबाइल व्हॅन क्रमांक १ वर कार्यरत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.