मुंबईत सर्वत्र गणरायाच्या विसर्जनाचा जल्लोष सुरू आहे. पाऊसधारेत गणपतीच्या विसर्जनाचा सोहळा सुरू आहे. परंतु, या जल्लोषाला गालबोट लागलं आहे. जुहूच्या समुद्रकिनाऱ्यावरून सायंकाळी ४.१५ मिनिटांनी एक अल्पवयीन मुलगा वाहून गेल्याची धक्कादयक घटना घडली आहे. मुंबई अग्निशमन दलाने यासंदर्भातील माहिती दिल्याचे वृत्त मिड डे ने दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >> Mumbai Ganpati Visarjan 2023 Live : विसर्जनावेळी समुद्र किनाऱ्यावर मत्स्यदंश झाल्यास काय कराल…

मुंबईच्या अनेक समुद्रकिनाऱ्यांवर जल्लोषाचां वातावरण आहे. त्यातच मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईसह किनाऱ्यावरील गर्दीचं नियोजन करण्याकरता पोलिसांसह अनेक स्वंयसेवकही मदतीला उतरले आहेत. हसन युसूफ शेख (१६) हा अल्पवयीन मुलगाही पोलिसांच्या मदतीला होता. त्यावेळी एकजण समुद्रात बुडाल्याचे जीवरक्षकांना दिसले. त्यामुळे त्यांनी तत्काळ या मुलाला बाहेर काढले. त्यावेळी तो जखमी अवस्थेत होता. त्यामुळे त्याला कूपर रुग्णालयात पाठवण्यात आले होते. परंतु, तिथे कूपर रुग्णालयाचे सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. देविदास वाळके यांनी हसन युसूफ शेख याला मृत घोषित केलं.

मत्स्यदंश होऊ नये म्हणून पालिकेने घेतली काळजी

ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत मुंबई येथील समुद्राच्या किनारपट्टीवर ‘ब्लू बटण जेलीफीश’, ‘स्टिंग रे’ प्रजातीच्या माशांचा वावर अधिक दिसून येतो. या पार्श्वभूमीवर विसर्जनादरम्यान मत्स्यदंश होऊ नये, याची काळजी नागरिकांनी घ्यावी असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. मत्स्यदंशाची घटना घडल्यास चौपाटी परिसरात पालिकेने वैद्यकीय कक्ष सज्ज ठेवला आहे. तसेच एक १०८ रूग्णवाहिका तैनात करण्यात आली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One person died at juhu chowpatty during ganapati visarjan sgk
Show comments