अंधेरी पूर्वेकडील परिसरात एका वानराने नुकताच एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. त्यानंतर घटनास्थळी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील सुटका आणि बचाव पथक येथून वानराला ताब्यात घेतले. तसेच, हल्ला झालेल्या व्यक्तीवर तत्काळ उपचार करण्यात आले.
हेही वाचा- मुंबईः माऊंटमेरी चर्चवर लष्कर-ए-तैय्यबाकडून हल्ल्याचा ई-मेल
गेल्या काही दिवसांपासून अंधेरी पूर्वेकडील सीप्झ विशेष आर्थिक क्षेत्र येथील परिसरात हल्लेखोर वानराचा वावर होता. गुरुवारी वानराने प्रकाश शिर्के यांच्यावर हल्ला करत त्याच्या पायाला जोरदार चावा घेतला. यात शिर्के रक्तबंबाळ झाले. त्यांना त्वरित जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच हल्लेखोर वानराला पकडण्यासाठी प्राणिप्रेमी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील सुटका आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर, वानराला पकडून वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले.