स्वाइन फ्लूमुळे मुंबईतील आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. या आठवडय़ात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या ओसरली असली तरी चार मृत्यूंची नोंद झाली. आतापर्यंत मुंबईतील मृत्यू पावलेल्यांची संख्या १८ वर गेली असून शहराबाहेरून उपचारांसाठी आलेल्यांपैकी २९ जणांना प्राण गमवावे लागले.
ट्रॉम्बे येथील ३२ वर्षांच्या महिलेला स्वाइन फ्लूच्या लक्षणांमुळे २७ मार्च रोजी इनलक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले.  प्रकृती ढासळल्याने २९ मार्चला नवी मुंबईच्या महानगरपालिका रुग्णालयात दाखल केले गेले. मात्र २४ तासांतच मुंबईच्या कस्तुरबा संसर्गजन्य आजार रुग्णालयात या महिलेला हलवले
गेले.   १ एप्रिल रोजी तिचा मृत्यू झाला. स्वाइन फ्लू झालेल्या रुग्णांची संख्या गेल्या आठवडाभरात खूपच कमी झाली आहे. फेब्रुवारीपासून पहिल्यांदाच, गुरुवारी स्वाइन फ्लूचा एकही रुग्ण शहराबाहेरून मुंबईत उपचारांसाठी आलेला नाही. आतापर्यंत २१६ रुग्ण शहराबाहेरून आले होते. मुंबईतील १५९८ रुग्णांना स्वाइन फ्लूचा संसर्ग झाल्याची नोंद आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One swine flu death in mumbai
Show comments