लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबईः मुंबई पोलिसांच्या अंमलीपदार्थ प्रतिबंधक कक्षाने (एएनसी) गेल्या वर्षभरात मुंबईतून जप्त केलेले सुमारे एक हजार किलो अंमलीपदार्थ नष्ट करण्यात आले. त्यात गांजा, चरस, मेफेड्रॉन (एमडी), कोकेन, हेरॉईन, मेथॅक्युलॉन, एमडीएमए, एक्सटॅसी गोळ्या या अंमलीपदार्थांचा समावेश आहे. मुंबई वेस्ट मॅनजमेंट लिमि.च्या नवी मुंबईतील तळोजा येथील प्रकल्पात या अंमलीपदार्थ विल्हेवाट लावण्यात आली. आंतरराष्ट्रीय बाजारातील त्याची किंमत सुमारे १२ कोटी रुपये असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. नष्ट करण्यात आलेले अंमलीपदार्थ २०१ गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आले होते.
गेल्यावर्षी मुंबईतून तब्बल चार हजार ९२८ कोटी रुपये किंमतीचे अमलीपदार्थ जप्त करण्यात आले होते. जप्त करण्यात आलेल्या ४०३६ किलो अमलीपदार्थांमध्ये एमडीसह हेरॅाईन, चरस, गांजा, कोकेन आदींचा समावेश आहे. त्यातील सुमारे १०१८ किलो अंमलीपदार्थ न्यायालयीन प्रक्रियेनंतर नुकतेच तळोजा येथे नष्ट करण्यात आले.
हेही वाचा…. मुंबईतील पाणी कपात रद्द होणार; २३ एप्रिलपासून पूर्ववत पाणीपुरवठा
मुंबई पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी कक्षाने गेल्यावर्षी एका कारवाईत २५०० कोटी रुपये किंमतीचे एमडी जप्त करून विक्रमी कारवाई केली होती. आता याप्रकरणी सर्व आठ आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मुंबईतील गोवंडीमधील शिवाजीनगर परिसरातून शमशुल्ला खान (३८) या तस्कराला २५० ग्रॅम एमडीसह ताब्यात घेऊन नंतर अटक करण्यात आली होती.
हेही वाचा…. मुंबई: सेवा निवृत्तीनंतर ओळखपत्राचा दुरुपयोग करणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी
त्यानंतर अंमलीपदार्थ विरोधी विभागाच्या वरळी कक्षाने अंमलीपदार्थांच्या विक्रीच्या साखळीची माहिती मिळविली. अमलीपदार्थ तयार करून विक्री करणाऱ्या टोळीतील प्रमुख आरोपी व रसायनशास्त्रातील पदवीधर प्रेमप्रकाश सिंह याच्यासह एकूण सात आरोपींना अटकही केली. पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल एक हजार ४३५ कोटी रुपये किंमतीचे ७०५ किलो एमडी जप्त केले होते