लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने २ मे रोजी सीएसएमटी ते नागपूर दरम्यान एकेरी विशेष रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक ०२१०३ ही अतिजलद एकेरी विशेष रेल्वेगाडी सीएसएमटी येथून २ मे रोजी रात्री १२ वाजून २० मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी ३ वाजून ३२ मिनिटांनी नागपूर येथे पोहचेल.

आणखी वाचा-मुंबई : सीएसएमटी येथे पुन्हा लोकल घसरली, तीन दिवसांत दुसरी घटना

या रेल्वेगाडीला दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबा असेल. तसेच या रेल्वेगाडीला दोन वातानुकूलित द्वितीय श्रेणीसह वातानुकूलित तृतीय श्रेणी डबे, तीन वातानुकूलित तृतीय श्रेणी डबे, ८ शयनयान आणि ६ सामान्य द्वितीय श्रेणी दोन गार्ड ब्रेक व्हॅन अशी रेल्वेगाडीची संरचना असेल. या रेल्वेगाडीचे आरक्षण १ मे रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर विशेष शुल्काद्वारे सुरू होईल.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One way special train between mumbai and nagpur mumbai print news mrj