हाजी अली उड्डाणपुलावर विरुद्ध दिशेने भरधाव वेगात जात असलेल्या प्राप्तीकर आयुक्त टी. के. शहा यांच्या गाडीने शनिवारी रात्री दोन टँक्सींना धडक दिली. त्यात दोन महिला जखमी झाल्या. तर भरधाव वेगात आलेल्या दुचाकीची धडक बसून गिरगाव चौपाटी येथे टॅक्सीचालकाला जखमी केले.
या पुलावरुन एकेरी मार्ग असतानाही मुख्य प्राप्तीकर आयुक्त शहा यांच्या चालकाने विरुद्ध दिशेने पुलावरून गाडी नेली. त्यावेळी या गाडीने समोरून येणाऱ्या दोन टॅक्सींना धडक दिली. त्या धडकेत दोन महिला जखमी झाल्या. पोद्दार रुग्णालयात उपचारानंतर या महिलांना घरी सोडण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी गाडीचा चालक ज्ञानेश्वर शिंदे याला अटक करुन नंतर त्याची जामिनावर सुटका केली. या अपघातात शहा यांना दुखापत झाली नसल्याचे वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक पवार यांनी सांगितले. दरम्यान, गिरगाव येथे भरधाव वेगाने मोटारसायकल चालविणाऱ्या दोन तरुणांच्या धडकेत एक टॅक्सीचालक जखमी झाला. गिरगाव चौपाटीजवळील आयडीयल जंक्शनसमोर शनिवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास ही घटना घडली.
प्राप्तीकर आयुक्तांच्या गाडीच्या धडकेत महिला जखमी
हाजी अली उड्डाणपुलावर विरुद्ध दिशेने भरधाव वेगात जात असलेल्या प्राप्तीकर आयुक्त टी. के. शहा यांच्या गाडीने शनिवारी रात्री दोन टँक्सींना धडक दिली. त्यात दोन महिला जखमी झाल्या. तर भरधाव वेगात आलेल्या दुचाकीची धडक बसून गिरगाव चौपाटी येथे टॅक्सीचालकाला जखमी केले.
First published on: 22-01-2013 at 03:21 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One women injured because of income tax officers van accident