मुंबई पालिकेची संकल्पना; गणेशोत्सव मंडळांना आवाहन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबई : करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव ‘एक प्रभाग, एक सार्वजनिक गणपती’ संकल्पनेवर साजरा करावा, अशी साद मुंबईतील अंधेरी येथील ‘के ’ पश्चिम पालिका विभाग कार्यालयाने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना घातली आहे. एका नगरसेवकाच्या प्रभागातील मंडळांनी एकत्र येऊन एका गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून उत्सव साजरा करीत एकोप्याचे दर्शन घडवावे, असे आवाहन यानिमित्ताने करण्यात आले आहे.

यंदा करोना संसर्गाचे गणेशोत्सवावर सावट आहे. त्यामुळे गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे. तसेच गणेशमूर्ती चार फुटांची असावी असे बंधनही घातले आहे.

मुंबईमधील करोनास्थिती अद्याप आटोक्यात आलेली नाही. झोपडपट्टय़ांमधील रुग्णसंख्येवर नियंत्रण येत असतानाच उच्चभ्रू वस्त्या आणि इमारतींमध्ये नवे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे पालिकेच्या ‘के-पश्चिम’ विभाग कार्यालयाने घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी, आरोग्य शिबिरांचा सपाटा लावला आहे.

अंधेरी पश्चिम भागात १५० हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून १३ नगरसेवक आहेत. प्रत्येक नगरसेवकाच्या प्रभागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी एकत्र येऊन एकच सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन ‘के-पश्चिम’ विभागाचे साहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनी केले आहे. अंधेरी (पश्चिम) आणि आसपासच्या परिसरातील मंडळांना विश्वास मोटे यांनी याबाबत खुले आवाहन पत्र पाठवले आहे.

या संकल्पनेला बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समिन्वय समितीने विरोध के ला आहे. मंडळांनी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याची तयारी करावी, असे समन्वय समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नरेश दहिबावकर यांनी के ले आहे.

विसर्जनाबाबत..

यंदा गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुकांना परवानगी नाही. विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची सुविधा करण्यात येणार असून तेथेच गणेश विसर्जन करावे. तलावांवर गर्दी होऊ नये या उद्देशाने सोसायटय़ांच्या प्रवेशद्वारावरच घरगुती गणेशमूर्ती स्वीकारून तिचे कृत्रिम तलावांमध्ये पालिकेतर्फे विसर्जन करण्याचा मानस आहे, असेही विश्वास मोटे यांनी सांगितले