मादक, अमली पदार्थ आणि ‘शेडय़ुल एक्स’ अंतर्गत येणाऱ्या औषधांच्या विक्रीवर निर्बंध

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

एकीकडे ऑनलाइन औषधविक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी कायद्याचा मसुदा केंद्र सरकारने तयार केला असून मादक व अमली पदार्थ आणि शेडय़ुल एक्सअंतर्गत येणाऱ्या औषधांच्या विक्रीवर मात्र या मसुद्यामध्ये पूर्णत: निर्बंध घालण्यात आले आहेत.

ऑनलाइन औषध विक्रीला कायदेशीररीत्या मान्यता देण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलली असून यासाठी कायद्याचा मसुदाही तयार करण्यात आला आहे. औषधांची विक्री आणि वितरण ‘औषधे व सौंदर्यप्रसाधने नियम १९४५’अनुसार नियंत्रित केले जाते. ऑनलाइन औषधविक्रीबाबतचा मसुदा या कायद्यामध्ये नव्याने समाविष्ट करण्याचे योजण्यात आले आहे. या नव्या मसुद्यानुसार, ई-फार्मसीच्या माध्यमातून औषधांच्या विक्रीमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांवर नियंत्रण आणले जाणार असून यामध्ये अमली व मादक पदार्थ (नार्कोटिक अ‍ॅण्ड सायकोट्रोपिक सबस्टेनसेस अ‍ॅक्ट १९८५) आणि शेडय़ुल एक्सअंतर्गत येणाऱ्या औषधांची विक्री कंपन्यांना करता येणार नाही.

ऑनलाइन औषधविक्री करणाऱ्या वेबपोर्टलची नोंदणी केंद्रीय परवाना विभागाकडे करणे बंधनकारक असणार आहे. ही नोंदणी तीन वर्षांसाठी ग्राह्य़ असून त्यानंतर पुन:नोंदणी केली जाईल, या मसुद्यामध्ये नमूद करण्यात आले आहे. वेबपोर्टलवरून औषध खरेदी करणाऱ्या ग्राहकांची औषधांच्या तपशिलासह माहिती जतन करणे बंधकारक आहे. ग्राहकांनी सादर केलेले ई-प्रिस्क्रिप्शन वेबपोर्टलवर जाहीर केले जाऊन कंपन्यांनीही ते जतन करणे आवश्यक असल्याचे या मसुद्यामध्ये स्पष्ट केले आहे.

वेबपोर्टलवर विक्री केली जाणारी औषधे, त्यांची उपलब्धतता, नोंदणीधारक डॉक्टरांची यादी वेळोवेळी अद्ययावत केलेली असावी. तसेच या औषधांच्या दर्जाबाबत कोणतीही तक्रार ग्राहकांना राज्य अन्न व औषध प्रशासनाकडे करता येणार आहे.

ऑनलाइन औषधविक्री करणाऱ्या कंपन्यांवर वचक ठेवण्यासाठी केंद्रीय परवाना अधिकाऱ्यांकडून दर दोन वर्षांनी कंपनीची तपासणी केली जावी, असेही या मसुद्यामध्ये सांगण्यात आले आहे.

औषधांची जाहिरात करण्यास मनाई

ऑनलाइन औषधविक्री करणाऱ्या कंपन्यांना रेडिओ, टीव्ही, मुद्रण, इंटरनेट किंवा अन्य कोणत्याही माध्यमामधून कोणत्याही औषधाची जाहिरात करता येणार नाही.

ग्राहकांची गुप्तता

पाळणे बंधनकारक: वेबपोर्टलवरून औषधे खरेदी करणाऱ्या ग्राहकाची वैयक्तिक माहितीची गुप्तता पाळली जाऊन कोणत्याही माध्यमातून खुली केली जाऊ नये. तसेच हे वेबपोर्टल केवळ भारतामध्ये स्थापित केले जावे आणि या वेबपोर्टलची माहिती भारतामधील सव्‍‌र्हरवर जतन करण्यात यावी, असे या मसुद्यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

फार्मासिस्ट ठेवणे बंधनकारक

ऑनलाइन औषधविक्री करणाऱ्या कंपन्यांनाही फार्मासिस्टशिवाय औषधे विकता येणार नसून नेमण्यात आलेल्या फार्मासिस्टचे नाव वेबपोर्टलवर प्रसिद्ध करणे बंधनकारक असणार आहे.

ग्राहक मदत केंद्र असणे आवश्यक

वेबपोर्टलवरून औषधे खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या शंकाचे निरसन करण्यासाठी ग्राहक मदत केंद्र असणे आवश्यक असून आठवडय़ातील सर्व दिवस किमान १२ तास सुरू असले पाहिजे.

मसुद्यामध्ये नमूद केलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यास ऑनलाइन औषध विक्री करणाऱ्या कंपनीला कारणे दाखवा नोटीस पाठवून त्यानुसार निलंबनापासून ते नोंदणी रद्द करण्यापर्यंतची कारवाई कंपनीविरोधात करण्यात येईल, असे या मसुद्यामध्ये स्पष्ट केले आहे.