विजेचे पैसे ऑनलाइन भरण्याची सुविधा सुरू झाल्यापासून अधिकाधिक ग्राहक त्याकडे वळत असून भांडुप परिमंडळात ऑक्टोबरमध्ये एक लाख ३१ हजार २७० वीजग्राहकांनी ऑनलाइन प्रणालीद्वारे २४ कोटी रुपयांचा वीजदेयक भरणा केला.ग्राहकाभिमुख वीजसेवा देण्यासाठी ‘महावितरण’ने दर महिन्याच्या वीजदेयकाचा ऑनलाइन भरणा करण्याची सुविधा सुरू केली. त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. आरंभी व्यापारी, औद्योगिक ग्राहक वीजदेयकाचा भरणा ऑनलाइन करायचे. आता ऑनलाइन देयक भरणाऱ्या घरगुती वीजग्राहकांची संख्याही लक्षणीय झाली आहे. भांडुप परिमंडळांतर्गत येणाऱ्या ठाणे नागरी मंडळातील ८९ हजार ७६ तर वाशी मंडळातील ४२ हजार १९४ ग्राहकांनी एकूण २४ कोटी ४५ लाख रुपयांची वीजदेयके ऑनलाइन प्रणालीद्वारे भरली.
या सुविधेचा अधिकाधिक वीजग्राहकांनी लाभ घ्यावा आणि वेळ व श्रम वाचवावेत, असे आवाहन भांडुप परिमंडळाचे मुख्य अभियंता नीळकंठ वाडेकर यांनी केले आहे.   

Story img Loader