|| इंद्रायणी नार्वेकर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
दोन महिन्यांत तीन हजार कोटी वसुलीचे आव्हान
मुंबई : आर्थिक वर्ष संपण्यासाठी के वळ दोन महिने उरलेले असताना मालमत्ता कराची के वळ ३३ टक्के वसुली करण्यात मुंबई महापालिके ला यश आले आहे. मालमत्ता करातून मिळणाऱ्या उत्पन्नासाठी पालिकेने ठेवलेले ६७६८ कोटींचे लक्ष्य कमी करून ४५०० कोटी रुपये करण्यात आले. मात्र, एक फेब्रुवारीपर्यंत पालिकेकडे केवळ १४४८ कोटी मालमत्ता करांतून वसूल झाले असल्याने उरलेल्या दोन महिन्यांत आता तीन हजार कोटींहून अधिक रक्कम वसूल करण्याचे आव्हान पालिका प्रशासनासमोर आहे.
पालिकेचा महत्त्वाचा उत्पन्नाचा स्रोत असलेल्या मालमत्ता करातून येणारे उत्पन्न यंदा आटले आहे. चालू आर्थिक वर्षात मालमत्ता करातून ६७६८ कोटींचे उत्पन्न अंदाजिले होते. मात्र करोना महामारी व परिणामी झालेली टाळेबंदी यामुळे छोटे व मोठे उद्योगधंदेही बंद झाले. त्याचा परिणाम मालमत्ता कराच्या संकलनावर झाला. तसेच कर निर्धारण व संकलन विभागातील कर्मचारी करोनासंबंधी कामे करण्यात व्यस्त असल्यामुळे कर संकलनावर त्याचा परिणाम झाला. त्यामुळे पालिके ने मालमत्ता करातील उत्पन्न सुधारित के ले. सुधारित अर्थसंकल्पानुसार चालू आर्थिक वर्षात आता पालिके ने कर वसुलीसाठीचे लक्ष्य ४५०० कोटींपर्यंत खाली आणले आहे. त्यामुळे आधीच २२६८ कोटींचे पालिके चे नुकसान झाले आहे. चालू आर्थिक वर्षात १ फे ब्रुवारीपर्यंत १४४८ कोटींची वसुली करण्यात आल्याची माहिती कर निर्धारण व संकलक विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे आता ४५०० कोटींचे लक्ष्य ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्यासाठी पालिकेला आणखी तीन हजार कोटींची वसुली करावी लागणार आहे.
दरम्यान, पालिके ची मालमत्ता कराची तब्बल १५००० हजार कोटींची संचित थकबाकी असून त्यापैकी जानेवारी २०२१ पर्यंत के वळ ६१९ कोटींची थकबाकी वसूल करण्यात आली आहे. मालमत्ता कराच्या रचनेबाबत उच्च न्यायालयात दाखल के लेल्या याचिके मुळे ही थकबाकी वाढली आहे. मात्र अंतरिम आदेशानुसार ५० टक्के रक्कम थकबाकीदारांना भरण्यास सांगण्यात आले आहे. ही पन्नास टक्के रक्क मही न भरणाऱ्यांविरोधात ८ मार्च २०२१ नंतर वसुलीची कारवाई करण्यात येईल अशी माहिती कर निर्धारण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
गतवर्षीही कमी वसुली
गेल्या आर्थिक वर्षात पालिके ने मालमत्ता कर वसुलीचे ५१०० कोटींचे लक्ष्य ठेवले होते. वसुली वाढवण्यासाठी पालिके ने रस्त्यावर फिरून ध्वनिक्षेपकावरून मालमत्ता कर भरण्याबाबत जनजागृती के ली होती. मात्र मार्चअखेरीस करोनामुळे टाळेबंदी झाली आणि पालिके ला आर्थिक वर्षाच्या अखेरीस के वळ ३७३५ कोटींचा मालमत्ता कर वसूल करता आला होता. तर ३५६४ एवढ्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली होती.
पुढील आर्थिक वर्षात सात हजार कोटींचे लक्ष्य
मालमत्ता कराच्या कररचनेत दर पाच वर्षांनी बदल करून भांडवली मूल्यामध्ये सुधारणा के ली जाते. २०२०-२१ मध्ये ही सुधारणा होणे अपेक्षित होते. मात्र टाळेबंदीमुळे आधीच सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडल्यामुळे आर्थिक भार कमी करण्यासाठी ही सुधारणा पुढील आर्थिक वर्षात म्हणजेच २०२१-२२ मध्ये करण्यात येणार आहे. त्यामुळे मालमत्ता करातून ७००० कोटींचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.