पावसामुळे मुंबईत पाणी साचण्याला केवळ मुंबई महापालिकेला जबाबदार धरता येणार नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पत्रकारांना सांगितले. मुंबईमध्ये जवळपास ३०० मिलीमीटर पाऊस पडला आहे. अजूनही मोठा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे वेधशाळेने म्हटले आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या पावसात पाणी साचण्याला महापालिकेला जबाबदार धरता येणार नाही, असे त्यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट दिली आणि परिस्थितीची माहिती घेतली. त्यानंतर ते पत्रकारांना म्हणाले, मुंबईसाठी एकच पालक यंत्रणा हवी, असे माझे मत आहे. मी एमएमआरडीएला दोष देणार नाही. पण अधिक चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी एकच पालक यंत्रणा असली पाहिजे. मिठी नदीच्या परिसरात राहणाऱया लोकांनी महापालिकेच्या कर्मचाऱयांना सहकार्य करावे, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मुंबईत पाऊस कोसळत असताना वर्धापन दिन साजरा करणे योग्य नाही, त्यामुळेच आजचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
केवळ मुंबई महापालिकेला जबाबदार धरता येणार नाही – उद्धव ठाकरे
पावसामुळे मुंबईत पाणी साचण्याला केवळ मुंबई महापालिकेला जबाबदार धरता येणार नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पत्रकारांना सांगितले.
आणखी वाचा
First published on: 19-06-2015 at 05:34 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Only bmc is not responsible for water logging says uddhav thackeray