इंद्रायणी नार्वेकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राष्ट्रपती पदक मिळवण्यासाठी स्वत:ची खोटी माहिती सादर करून प्रशासनाची आणि राज्य सरकारची दिशाभूल केल्याप्रकरणी अग्निशमन दलाच्या प्रमुख पदावरून शशिकांत काळे यांना हटवले असले तरी त्यांना केवळ पदावनत केले आहे. एवढय़ा मोठय़ा गुन्ह्य़ानंतरही काळे मोकळेच आहेत. काळे यांच्यावर निलंबनाची कारवाईही करण्यात आलेली नाही आणि गुन्हाही दाखल करण्यात आलेला नाही.

काळे यांच्यावर आतापर्यंत चार वेगवेगळ्या गुन्ह्य़ांसाठी पालिकेने निलंबनाची कारवाई केली. तसेच दंड ठोठावण्यात आला आहे. मात्र एकाही प्रकरणात त्यांची चौकशी पूर्ण झाली नाही. उलट त्यांना बढती मिळत गेली. आतापर्यंत चार मोठय़ा गुन्ह्य़ांतून सहीसलामत सुटलेल्या काळे यांच्यावर या वेळी तरी ठोस कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या वेळेस त्यांनी २६ जानेवारीला अग्निशमन दलाच्या अधिकारी व जवानांना दिला जाणारा राष्ट्रपती पुरस्कार खिशात घालण्यासाठी अन्य जवानांबरोबर स्वत:चेही नाव दिले होते. मात्र त्यासाठी चुकीची माहिती दिल्याचे आढळून आले. त्यांनी गेल्या दहा वर्षांतील गोपनीय अहवालांची माहिती देताना ‘अ उत्कृष्ट’ अशी प्रतवारी देण्यात आल्याचे दाखवले. २०१४-१५ मध्ये काळे यांना पालिकेच्या सेवेतून निलंबित करण्यात आले होते. मात्र या वर्षीही ‘अ उत्कृष्ट’ मिळाल्याचे त्यांनी दाखवले. ही बाब निदर्शनास आल्यानंतर काळे यांना २५ नोव्हेंबरला मुख्य अग्निशमन अधिकारी पदावरून हटवण्यात आले. या गंभीर प्रकारामुळे काळे यांची सहआयुक्त (सामान्य प्रशासन) यांच्यामार्फत खात्यांतर्गत चौकशी सुरू करण्यात आली. तसेच पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी नगरविकास विभागाला पत्र लिहून पदकासाठीची शिफारस तातडीने मागे घेतली.

काळे यांना उपप्रमुख अग्निशमन अधिकारी या पदावर पदावनत करण्यात आले आहे. मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. सध्या काळे स्वत:हूनच रजेवर गेल्याचे समजते.

काळे यांची चौकशी दोन महिन्यांत पूर्ण होईल. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.

ज्या व्यक्तीवर आरोप आहेत त्या व्यक्तीने कागदपत्रांबाबत छेडछाड करू नये म्हणून निलंबित केले जाते. मात्र या प्रकरणी त्यांनी सादर केलेली सर्व कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत, अशी प्रतिक्रिया अधिकाऱ्यांनी दिली आहे.

काळेंची काळी कारकीर्द

* काळे यांना आठ वर्षांपूर्वी अग्निशमन दलाचे इंधन चोरून काळ्या बाजारात विकल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले होते. परंतु दीड वर्षांनंतर त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले.

* विकास नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन करून इमारतींना ना हरकत प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी त्यांना एकदा ५० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला होता

* माहीम येथील एका इमारतीभोवती ६ मीटर मोकळ्या जागेची अट डावलून ना हरकत प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी त्यांना निलंबित केले होते व त्यांची खात्यांतर्गत चौकशी सुरू करण्यात आली होती. त्याच दरम्यान ते ठाणे शहरात प्रमुख अग्निशमन अधिकारी म्हणून प्रतिनियुक्तीवर गेले.

*  तीनच महिन्यांपूर्वी ते मुंबई अग्निशमन दलात मुख्य अग्निशमन अधिकारी म्हणून रुजू झाले. त्यांचा असा इतिहास असतानाही त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता केवळ चौकशी सुरू करण्यात आली आहे.

शशिकांत काळे यांची बाजू समजून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु संपर्क होऊ शकला नाही.