राज्यातील भोंगे आणि हनुमान चालीसा या वादाला सतत राजकीय फाटे फोडले जात आहेत. एक नवं ट्विट करत या वादात आता कॉंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी उडी घेतली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला फक्त महाराष्ट्र दिसतो पण भाजपा शासित कर्नाटक का दिसत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. श्रीराम सेनेसोबत मनसेनं तेथील आंदोलनात सहभागी व्हावं. फडणवीस साहेबांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री का घाबरले ? भाजपा आणि मनसे महाराष्ट्राला का बदनाम करत आहे हे स्पष्ट करावं. अश्या आशयाचं ट्विट करत सचिन सावंत यांनी भाजपा आणि मनसेला टार्गेट केलं आहे.
कॉंग्रेस नेते सचिन सावंत यांनी दाखला म्हणुन दिलेल्या बातमीनुसार कर्नाटक सरकार मशिदींवरील भोंग्यांविरोधात कारवाई करण्यात सक्षम नसल्यामुळे सोमवारपासुन कर्नाटकमधील एक हजार देवळांमध्ये पहाटे पाच वाजता हनूमान चालिसा, सुप्रभात, ओंकार किंवा भक्ती गीतं लावण्याचा ईशारा श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालीक यांनी दिला आहे. त्या बातमीत प्रमोद मुतालीक यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सारखं धाडस कर्नाटकच्या मुख्मंमंत्री आणि गृहमंत्र्यांनी दाखवावं असं आवाहन केल्याचा उल्लेख आहे. प्रमोद मुतालीक यांनी कर्नाटकमधील एक हजारांहून अधिक देवळांच्या पुजा-यांशी व्यवस्थापकांशी संपर्क केला असल्याचा दावा केला आहे. न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करण्या-यांवर कारवाई होत नसल्याचा राग असल्यामुळे आम्ही हे सरकार विरोधात आंदोलन करणार असल्याचं श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालीक यांनी म्हटल्याचा उल्लेख सचिन सावंत यांनी ट्विट केलेल्या बातमीत करण्यात आला आहे.
कॉंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी त्यांच्या ट्विटच्या माध्यामातून मनसे आणि भापजाला टोला लगावला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील मशिदींवरील भोंगे उतरवा अन्याथा मनसे मशिदींसमोर हुनुमान चालिसा वाचेल ही भूमिका घेतली. या भूमिकेला राज्यातील भाजपाच्या नेत्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे समर्थन दिलं. कर्नाटकमध्ये भाजपाची सत्ता आहे. असं असताना तिथे अजुनही मशिदींवरील भोंगे उतरवले गेले नाहीत. कर्नाटकमध्ये श्रीराम सेनेनं कर्नाटक सरकार भोंग्यावर कारवाई करत नसल्यामुळे मंदिरांमध्ये हनुमान चालिसा आणि भक्ती गीतं लावण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे राज ठाकरे कर्नाटकात श्रीराम सेनेेसोबत आंदोलन करून भाजपाच्या मुख्यंमंत्र्यांना आव्हान देणार का असा प्रश्न उपस्थित केला आहे. सचिन सावंत यांच्या म्हणण्यानुसार मनसे भाजपा शासीत राज्यात मशिंदींवरील भोंगे उतरवण्याबाबत ठाम भुमीका घेत नाहीये.