मुंबई: ‘ना विकसित क्षेत्रा’त परवडणाऱ्या घरांच्या प्रकल्पांसाठी ‘विशेष विकसित क्षेत्र’ निर्माण करण्याची योजना राज्य शासनानेच रद्द केली आहे. मात्र ‘ना विकसित क्षेत्रा’त असलेल्या झोपडपट्टी पुनर्विकासालाच परवानगी दिली जाणार आहे. ही अधिसूचना अंतिम झाल्यानंतर ‘ना विकसित क्षेत्रा’त असलेल्या झोपड्यांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे.

याबाबत नगरविकास विभागाने विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०३४ मध्ये फेरबदल करणारी अधिसूचना हरकती व सूचनांसाठी जारी केली आहे. या नव्या फेरबदलामुळे आता यापुढे ना विकसित क्षेत्रात परवडणाऱ्या घरांची योजना राबविता येणार नाही. याआधी ना विकसित क्षेत्रात परवडणाऱ्या घरांच्या योजनांच्या नावे मोठ्या प्रमाणात बांधकाम करण्यास परवानगी देण्यात आली होती. आता फक्त झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबविणे शक्य होणार आहे. मात्र त्यासाठी प्रतिहेक्टर ६५० किंवा त्यापेक्षा अधिक झोपड्या असणे आवश्यक आहे.

crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
world environment council lokrang
विळखा काजळमायेचा!
mumbai weather updates city records moderate air quality
मुंबईतील हवेचा दर्जा मध्यम श्रेणीतच
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
pune police arrested three for stealing mobile phones
मोबाइल चोरणाऱ्या सराइतांना अटक; १२ मोबाइल संच जप्त; ९ गुन्हे उघड
Air Quality Index, air pollution, Uran city, raigad district
हवा प्रदूषणात उरण देशात तिसऱ्या क्रमांकावर, शहरातील नागरिकांना सर्दीखोकला तसेच श्वसनाचा त्रास
Municipal Commissioner Bhushan Gagrani warns Law Department not to delay in court cases
न्यायालयीन प्रकरणांत दिरंगाई नको, महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांचा विधि विभागाला इशारा

हेही वाचा… भूभाड्याच्या बनावट पावतीद्वारे म्हाडाच्या रहिवाशांची फसवणूक; म्हाडाच्या मुंबई मंडळातील कर्मचाऱ्याचा प्रताप

प्रस्तावित विकास नियंत्रण नियमावलीत मंजूर आणि वगळलेले आराखडे असे दोन भाग आहेत. मंजूर आराखडे लगेच अमलात येतात तर वगळलेले आराखड्यात नव्या तरतुदी जारी करून ते हरकती व सूचनांसाठी जारी केले जातात. ना विकसित क्षेत्रात विशेष विकास क्षेत्र निर्माण करण्यास तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नकार दिला होता. त्यामुळे काही भूखंड मालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने आठ आठवड्यांत याबाबत निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागानेही विशेष विकास क्षेत्र स्थापण्यास मान्यता दिलेली नाही. मात्र झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा केला आहे.

हेही वाचा… घरफोडी करणाऱ्या चोराचा दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला

झोपड्या असलेला परिसर विशेष विकास क्षेत्र घोषित केले जाईल. अशा क्षेत्रातील ६५ टक्के भूखंडच झोपडपट्टी पुनर्विकास योजनेसाठी वापरता येणार असून उर्वरित ३५ टक्के भूखंड हा ना विकसित क्षेत्र राहणार आहे. विशेष विकसित क्षेत्रात परवडणाऱ्या घरांचा प्रकल्प उभारण्याबाबाबत असलेला ३३(८) ही तरतूद रद्द करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. ना विकसित क्षेत्राला यापुढे फक्त ०.०२५ इतके चटईक्षेत्रफळ लागू असणार आहे.