मुंबई : मुंबई महापालिकेच्या सर्व प्रमुख रुग्णालयांमध्ये दररोज येणाऱ्या हजारो रुग्णांसाठी बाह्यरुग्ण विभागातील तपासणी सकाळी ८ वाजता सुरू झालीच पाहिजे, असे आदेश अतिरिक्त पालिका आयुक्त सुधाकर शिंदे यांनी जारी केले आहेत. या आदेशाचे काटेकोर पालन करण्याची जबाबदारी सर्व अधिष्ठात्यांवर सोपविण्यात आली आहे.

अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांनी १९ डिसेंबर रोजी काढलेल्या आदेशात, यापुढे कोणत्याही परिस्थितीत सकाळी आठ वाजता बाह्यरुग्ण विभागात रुग्ण तपासणी सुरू होणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. डॉक्टरांनी ही वेळ काटेकोरपणे पाळावी यासाठी यापुढे त्यांची उपस्थिती बायोमेट्रिक पद्धतीने केली जाणार असून कामावर येण्याची व जाण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी घेतली जाणार आहे. तसेच ही बायोमेट्रिक हजेरी डॉक्टरांच्या वेतनाशी सलग्न करण्यात येणार असल्याचे याबाबतच्या आदेशात नमूद केले आहे. महत्त्वाचे म्हणजे बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांना वेळेत उपचार मिळावे यासाठी रुग्णांच्या नोंदणीचे काम सकाळी सात वाजता सुरू करण्यास सांगितले आहे. यामुळे रुग्ण वा नातेवाईकांचा खोळंबा थांबेल असा विश्वास डॉ. सुधाकर शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

makarand deshpande starrer movie pani puri
आहे चटकदार पण…
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Eknath Shinde allegation regarding Mahavikas Aghadi manifesto Jalgaon news
महाविकास आघाडीने जाहीरनामा चोरला; एकनाथ शिंदे यांचा आरोप
Heavy police presence on the occasion of Prime Minister narendra modis visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त कडक पोलीस बंदोबस्त
Municipal corporation Thane, illegal hoarding holders Thane, illegal hoarding Thane,
ठाण्यात ५२ बेकायदा होर्डिंगधारकांना पालिकेच्या नोटीसा, १० कोटी ९६ लाखांचा दंड पालिका करणार वसूल
Loksatta lokrang A review of the achievements of Maharani Baijabai Shinde
दखल: बायजाबाई यांच्या कर्तृत्वाचा आढावा
Eknath shinde
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या कामांना कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात किती मार्क्स? काय म्हणत आहेत ठाणेकर?
bombay high court slams bmc officer over cm order
मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला महत्व नाही का? उच्च न्यायालयाची महापालिका प्रशासानाला विचारणा

हेही वाचा >>> मुंबई : विरार – बोळीजमधील घरांसाठी ६९१ अर्ज, सूर्याचे पाणी आल्यानंतर प्रतिसाद वाढण्यास सुरुवात

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका रुग्णालयांमध्ये ‘झिरो प्रिस्क्रिप्शन’ राबविण्यास सांगितले होते. यामुळे रुग्णांना बाहेरून औषधे लिहून देणे बंद करून त्यांना रुग्णालयांमध्येच औषध उपलब्ध होणार आहे. याचीही अंमलबजावणी पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये सुरू करण्यात येत आहे. पालिका रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेता औषध खरेदीवर सध्या होत असलेल्या खर्चापेक्षा १४०० कोटी रुपये अधिकचा खर्च करावा लागणार असल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले.

मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयांमध्ये बाह्यरुग्ण विभागात वर्षाकाठी २१ लाख ५२ हजार रुग्ण उपचार घेतात तर शीव रुग्णालयांमध्ये १९ लाख रुग्ण उपचारासाठी येत असतात. नायर रुग्णालयात वर्षाकाठी ११ लाख रुग्णांवर उपचार होतात तर कुपर रुग्णालयांमध्ये साडेसात लाख रुग्ण तपासणी होते. याशिवाय नायर दंत महाविद्यालय व रुग्णालयात सुमारे आठ लाख रुग्णांवर बाह्यरुग्ण विभागात उपचार केले जातात. याचाच अर्थ पालिकेच्या या पाच वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न रुग्णालयांमध्ये वर्षाकाठी बाह्यरुग्ण विभागात ६८ लाख २० हजार रुग्णांवर उपचार केले जातात. याशिवाय पालिकेची १६ उपनगरीय रुग्णालये, अन्य रुग्णालये व दवाखाने यात मिळून सुमारे तीन कोटी रुग्णांची बाह्यरुग्ण विभागात तपासणी केली जाते.

हेही वाचा >>> दीड हजार बालकांच्या कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया रखडल्या! वयोमर्यादा वाढविण्यात केंद्राकडून उदासीनता…

कस्तुरबा साथरोग रुग्णालयांमध्ये वर्षाकाठी १,१४८६५ हजार रुग्णांची बाह्यरुग्ण विभागात तपासणी होते तर शिवडीच्या क्षयरोग रुग्णालयांमध्ये २२,५६२ रुग्ण तपासले जातात. कुष्ठरोग्याच्या अॅक्वर्थ रुग्णालयात २१,५६४ रुग्ण तपासणी तर मुरली देवरा डोळ्यांच्या रुग्णालयात ४६ हजार आणि कान, नाक व घसा रुग्णालयात ६८ हजार ५०० रुग्णांची वर्षाकाठी तपासणी केली जाते. मुंबई महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये वर्षाकाठी सुमारे तीन कोटी रुग्णांची बाह्यरुग्ण विभागात तपासणी केली जात असते. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रुग्णांना वेळेत उपचार व तपासणी होणे गरजेचे असल्याने बाह्यरुग्ण विभाग बरोबर सकाळी आठ वाजता सुरु होणे आवश्यक असल्याचे सुधाकर शिंदे यांनी सांगितले.