आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ व कुटुंबीयांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे (एसीबी) केली जाणारी खुली चौकशी अद्याप पूर्ण झालेली नाही. चौकशीचा दुसरा अंतरिम अहवाल बुधवारी सादर करण्यात येणार असल्याची माहिती एसीबीतर्फे सोमवारी उच्च न्यायालयात देण्यात आली; तर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मात्र सध्या तरी चौकशीचा दुसरा अंतरिम अहवाल सादर करणार नसल्याचे न्यायालयाला कळवले.
दिल्लीतील महाराष्ट्र सदन आणि इतर प्रकरणांमध्ये भुजबळ व कुटुंबीयांनी लाच घेतल्याचा आरोप करत आम आदमी पक्षातर्फे अंजली दमानिया यांनी या प्रकरणी जनहित याचिका केली होती. तसेच आरोपांच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याची मागणी केली होती. न्यायालयानेही दमानिया यांनी केलेल्या आरोपांची आणि दावा सिद्ध करण्यासाठी सादर केलेल्या कागदपत्रांची गंभीर दखल घेत आरोपांच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले होते. शिवाय एसीबी आणि ईडीच्या महासंचालकांनी संयुक्तपणे या आरोपांची चौकशी करावी, असेही न्यायालयाने डिसेंबरमध्ये या संदर्भातील आदेश देताना स्पष्ट केले होते. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात एसीबीने चौकशीचा पहिला मोहोरबंद अंतरिम अहवाल न्यायालयात सादर केला होता. तसेच भुजबळ आणि कुटुंबीयांच्या खुल्या चौकशीसाठी ११ पथके स्थापन करण्यात आल्याची माहिती दिली होती.
मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सोमवारी या प्रकरणी सुनावणी झाली. त्या वेळेस भुजबळ आणि कुटुंबीयांची खुली चौकशी अद्याप पूर्ण झालेली नाही, अशी माहिती एसीबीतर्फे अ‍ॅड्. आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयाला दिली. तसेच चौकशीचा दुसरा अंतरिम अहवालसुद्धा तयार असून बुधवारी तो सादर केला जाईल, असेही न्यायालयाला सांगितले, तर दुसरीकडे आपण मात्र चौकशीचा दुसरा अहवाल सध्या तरी सादर करणार नाही, असे ‘ईडी’तर्फे न्यायालयाला सांगण्यात आले. एसीबीच्या माहितीनंतर न्यायालयाने प्रकरणाची सुनावणी बुधवारी ठेवली आहे.

principal suspended for negligence in duty in midday meal food poisoning case pmd
वर्धा : कर्तव्यात कसुर; मुख्याध्यापक निलंबित; शालेय पोषण आहार विषबाधा प्रकरण
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Rahul Narwekar
Rahul Narwekar : संख्याबळ नाही तरीही मविआला विरोधी पक्षनेतेपद देणार का? राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितलं
Rahul narvekar
विरोधी पक्षनेतेपदासाठी अद्याप अर्जच नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे स्पष्टीकरण
loksatta editorial on india s relations with Sheikh Hasina
अग्रलेख : वंग(मैत्री)भंगाचे वास्तव…
Jyotiraditya Scindia lady killer said Kalyan Banerjee
“सिंधिया लेडी किलर”, तृणमूलचे खासदार असं का म्हणाले? केंद्रीय मंत्र्याचंही जशास तसं प्रत्युत्तर
43 ministers maharashtra
विश्लेषण : महाराष्ट्रात ४३ मंत्रीच? मंत्रिमंडळात मंत्र्यांची संख्या किती असते? या संख्येवर बंधने का असतात?
mamata banerjee latest marathi news
विश्लेषण : ‘इंडिया’ आघाडीचे नेतृत्व ममतांकडे? राज्यांतील पराभवानंतर काँग्रेसच्या स्थानाला धक्का…
Story img Loader