मुंबई : प्रसिद्ध दिवंगत लेखक जयवंत दळवी यांची कल्पनाशक्ती विलक्षण झेप घ्यायची. साहित्यक्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. एखाद्या कलाकृतीच्या कथानकापेक्षा त्यांनी पात्रांवर अधिक भर दिला आणि सूक्ष्म निरीक्षणातून मानवी भावभावनांचा वेध घेणारे लेखन केले. ते एखाद्या व्यक्तिरेखेच्या मनाचा वेध जाऊन लेखन करायचे, हे त्यांचे वैशिष्टय होते, असे मत दळवी यांनी लिहिलेल्या नाटकात काम केलेल्या कलाकारांनी ‘स्मृतिजागर मनस्वी व्यक्तिमत्त्वाचा’ या कार्यक्रमात व्यक्त केले.

‘द मुंबई लिटरेचर लाईव्ह फेस्टिव्हल’मध्ये प्रसिद्ध साहित्यिक दिवंगत जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘स्मृतिजागर मनस्वी व्यक्तिमत्त्वाचा’ या विशेष कार्यक्रमाचे नरिमन पॉईंट येथील ‘एनसीपीए’मध्ये आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जयवंत दळवी यांची नाटके आणि अन्य साहित्यावर आधारित गप्पांमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी, स्वाती चिटणीस, ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर, शैलेश दातार सहभागी झाले होते. लेखक – दिग्दर्शक प्राजक्त देशमुख यांनी त्यांच्याशी संवाद झाला. तर नाट्यलेखक, समीक्षक राजीव नाईक हे मुख्य सूत्रधाराच्या भूमिकेत होते. यावेळी जयवंत दळवी लिखित ‘बॅरिस्टर’ व ‘नातीगोती’ या नाटकांतील काही भागांचे अभिवाचन करून आठवणींना उजाळा देण्यात आला. तसेच निवडक ‘ठणठणपाळ’चे वाचनही करण्यात आले. तसेच ‘जयवंत दळवी – व्यक्ती आणि लेखक’ या विशेष पुस्तकाचेही प्रकाशन करण्यात आले.

The Political Philosophy of Niccolo Machiavelli
तर्कतीर्थ विचार : मार्क्स – कामगारांचा मॅकिआव्हेली
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Myra Vaikul Upcoming Movie Mukkam Post Devach Ghar review
छोट्यांची मोठी गोष्ट
Loksatta Lokrang Shades of greedy people on stage play
रंगभूमीवरील लोभस माणसांच्या छटा
Loksatta book mark Patriot Alexei Navalny Russian security forces
बुकमार्क: अकाली मावळलेला झुंजार तारा
zee marathi new serial promo tula japanar ahe promo announces
तारीख अन् मुहूर्त ठरला! ‘झी मराठी’ची थ्रिलर मालिका ‘या’ दिवशी सुरू होणार; संपूर्ण स्टारकास्ट आली समोर, पाहा जबरदस्त प्रोमो
Tarkatirtha Laxman Shastri Joshi Marxs Hindi Ancestor
तर्कतीर्थ विचार: मार्क्सचे हिंदी पूर्वज
Interview Stress Job Placement Interview career news
पहिले पाऊल: मुलाखतीचा ताण

हेही वाचा >>>चेंबूरमधील अपक्ष उमेदवार सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार

‘मराठी साहित्यविश्वात अनेक दिग्गज लेखक आहेत आणि होऊन गेले. परंतु हे सर्व दिग्गज लेखक आंतरराष्ट्रीय दर्जाचे असूनही मराठी वाचकांपुरतेच मर्यादित राहिले. जयवंत दळवी हे थोर साहित्यिक असून त्यांनाही आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थान मिळणे आवश्यक आहे. हेच जाणून जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘द मुंबई लिटरेचर लाईव्ह फेस्टिव्हल’मध्ये ‘स्मृतिजागर मनस्वी व्यक्तिमत्त्वाचा’ या कार्यक्रमाचे आयोजन केले’, असे मत ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी प्रास्ताविकातून व्यक्त केले.

‘जयवंत दळवी यांच्या नाटकातील विनोदाची पद्धत वेगळी होती. त्यांच्या नाटकातील विनोद हे खळखळून हसवण्याऐवजी मर्म विनोद होते. सुरुवातीला प्रेक्षक त्या विनोदाचा आनंद घ्यायचे, मात्र नंतर सखोल विचार करायचे. ‘बॅरिस्टर’मधील राधाक्का सुरूवातीला गोंडस वाटायची, मात्र शेवटाला ते पात्र गंभीर बनायचे. त्यामुळे सुरुवातीला या व्यक्तिरेखेचा अभ्यास करणे कठीण गेले’, असे सुहास जोशी म्हणाल्या.

हेही वाचा >>>रिझर्व बँकेला ‘लश्कर-ए-तैयबा’च्या नावाने धमकी, कशी आणि कोणती धमकी दिली वाचा…

‘जयवंत दळवी यांनी लिहिलेल्या काही नाटकांतील काही पात्रांना संवाद कमी असले तरी त्यांचा प्रभाव मोठा आहे. दळवी यांचे ‘बॅरिस्टर’ हे नाटक खूप गाजले, मात्र यशाने भुरळून न जाता त्यांनी दुसरा भाग काढला नाही. त्याकाळच्या समर्थ लेखकांकडे अनेक विषय होते. ते सातत्याने वेगवेगळ्या विषयांवर काम करायचे. हा त्यांचा साहित्यिक दर्जा होता. मात्र हल्ली नाटककार फार कमी दिसतात’, असे प्रदीप वेलणकर यांनी सांगितले.

‘जयवंत दळवी ज्या पद्धतीने मानवी मनाचे सूक्ष्म निरीक्षण करून लेखन करायचे ते विलक्षण होते. ते पात्रांचा सखोल अभ्यास करायचे. त्यांनी लिहिलेल्या ‘बॅरिस्टर’ नाटकात काम करायला मिळणे, ही माझी पूर्वजन्मीची पुण्याई आहे’, असे शैलेश दातार म्हणाले.

अतुल परचुरे यांच्या आठवणींना उजाळा

प्रसिद्ध अभिनेते अतुल परचुरे यांचे दीर्घ आजाराने अलीकडेच निधन झाले. अतुल यांनी जयवंत दळवी लिखित ‘नातीगोती’ या नाटकात विशेष मुलाची साकारलेली भूमिका गाजली. अतुल यांच्या या भूमिकेबाबत सांगताना सहकलाकार भावूक झाले. ‘अतुल परचुरे याने अतिशय सुंदर व गोंडस पद्धतीने ‘नातीगोती’ नाटकात विशेष मुलाची भूमिका साकारली. लोकांना विश्वास बसायचा नाही की अतुल हा सर्वसामान्य मुलगा आहे, इतकी चोखपणे त्याने भूमिका साकारली होती. यासंदर्भात विचारणा करण्यासाठी नाटक संपल्यानंतर प्रेक्षक आवर्जून थांबायचे आणि आम्हाला अतुलला पाहायचे आहे, असा आग्रह धरायचे’, अशी आठवण स्वाती चिटणीस यांनी सांगितली. तर शैलेश दातार म्हणाले की, ‘अतुल हा वाचिक अभिनयात तरबेज असल्याचे सर्वांना माहीत होते. परंतु ‘नातीगोती’ नाटकातील भूमिका त्याने अंगिक अभिनयाच्या जोरावर अतिशय चोखपणे साकारली’.

Story img Loader