लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई: मुंबई महानगरपालिकेचा महत्त्वाकांक्षी आणि भविष्यात मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाचे काम सध्या प्रगतीपथावर असून या मार्गाच्या उभारणीचा प्रवास छायाचित्रांच्या माध्यमातून अनुभवण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

मुंबई महानगरपालिकेने नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्सच्या सहकार्याने नरिमन पॉईंट येथील एनसीपीएच्या दिलीप पिरामल आर्ट गॅलरीमध्ये ‘किनारी मार्गाची भ्रमणगाथा’ या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन केले असून हे प्रदर्शन रविवार, २१ मेपर्यंत दररोज दुपारी १२ ते रात्री ८ या वेळेत पाहता येणार आहे.

हेही वाचा… आठ दशके उलटली तरी घरांचा ताबा नाही, ९३ वर्षांच्या मालकाला उच्च न्यायालयाचा दिलासा

मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाची रचना, नियोजन, त्यासाठी वापरण्यात आलेले आधुनिक तंत्रज्ञान, नावीन्यपूर्ण अभियांत्रिकी कौशल्य, प्रकल्पाचे व्यवस्थापन आणि प्रकल्प साकारताना राखलेला पर्यावरणाचा समतोल या सर्व गोष्टी छायाचित्रांच्या माध्यमातून पाहता येतील. अधिक माहितीसाठी मोबाइल क्रमांक ८१०८००३३११ वर संपर्क साधावा.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opportunity to experience the journey of construction of the mumbai coastal route through photographs mumbai print news dvr
Show comments