ठाण्यातील हॉटेल टीप टॉप प्लाझा येथे ८ व ९ जून रोजी ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यशाळा

मुंबई : शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना यूपीएससी, एमपीएससी यांसारख्या स्पर्धा परीक्षा देण्याचे वेध लागलेले असतात. या परीक्षांच्या दृष्टीने विद्यार्थ्यांची तयारीही सुरू होते. परंतु स्पर्धा परीक्षांची तयारी नियोजनबद्ध कशी असावी, याबाबत विद्यार्थ्यांना पुरेशी कल्पना नसते. त्यामुळे सध्या सेवेत असलेल्या आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांचा प्रवास जाणून घेण्याची संधी ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना उपलब्ध झाली आहे. ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यशाळेत आयएएस अधिकारी सौरभ राव (८ जून) व आयपीएस अधिकारी डॉ. श्रीकांत परोपकारी (९ जून) विद्यार्थ्यांशी संवाद साधणार असून स्वतःचा प्रवासही मांडणार आहेत. ठाणे पश्चिमेकडील एल. बी. एस. मार्गावरील हॉटेल टीप टॉप प्लाझा येथे सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत ही कार्यशाळा होणार आहे.

सध्या बहुसंख्य तरुण – तरुणींचा स्पर्धा परीक्षा देण्याकडे कल वाढू लागला आहे. परंतु स्पर्धा परीक्षा देण्यासाठी अभ्यासाचे नियोजन कसे करावे, नेमका किती आणि कसा अभ्यास करणे आवश्यक आहे, विविध क्षेत्रांसह दैनंदिन घडामोडींची माहिती कशी जाणून घ्यायची, दिवसभरातील वेळेचे गणित कसे जुळवावे, शारीरिक तंदुरुस्तीसह मानसिक आरोग्य कसे जपावे, ताण कसा हाताळायचा, स्वतःची पडताळणी करून आत्मविश्वास कसा ठेवायचा आदी विविध गोष्टींबाबत ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव ८ जून रोजी आणि भिवंडी परिमंडळचे उपायुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी ९ जून रोजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

reporter abused while reporting
पिंपरी- चिंचवडमध्ये पोलिसांसमोरच प्रसारमाध्यमांच्या पत्रकारांना दमदाटी; देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
tanishk vice president arun narayan
‘नैसर्गिकच्या तुलनेत कृत्रिम हिऱ्यांना अनेकांगी मर्यादा’; तनिष्कचे उपाध्यक्ष अरुण नारायण यांचे प्रतिपादन
strike the employees of the motor vehicle department for various demands pune news
‘आरटीओ’तील संपात मध्यस्थ तेजीत! नागरिकांकडून राजरोस जादा पैशांची लूट सुरू; अधिकारी बघ्याच्या भूमिकेत
Due to Union Home Minister Amit Shahs visit administration denied protest permission at golf club
नाशिक : प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकांची निदर्शने
Task Fraud, Retired intelligence officer, Mumbai,
मुंबई : सेवानिवृत्त गुप्तवार्ता अधिकाऱ्याचे टास्कच्या नादात खाते रिकामे, तीन दिवसांत गमावले ११ लाख
Controversial Assistant Sub-Inspector of Police Siddharth Patil suspended from service
अखेर ‘तो’ वादग्रस्त सहायक पोलीस उपनिरीक्षक निलंबित, काय घडले?
Bombay HC
उच्च न्यायालयाने केंद्र सरकारचा ‘fake news’ fact check rule मोडीत का काढला? त्रयस्थ न्यायाधीशांची गरज का भासली?

हेही वाचा >>> भविष्यात मुंबईला पाच वातावरणीय धोके; उष्णता, पूर, वायू प्रदूषण अशा धोक्यापासून मुंबईला वाचवण्यासाठी पालिकेचा कृती आराखडा

बदलत्या तंत्रज्ञानाच्या जगात विविध क्षेत्रांतील स्पर्धा कमालीची वाढली आहे. या काळात विद्यार्थी व पालकांमधील संवादही महत्त्वाचा ठरतो. या ताणतणावाचे नियोजन कसे करावे आणि विद्यार्थी व पालकांचे नाते घट्ट होऊन कसा मनमोकळा संवाद झाला पाहिजे याबाबत ८ जून रोजी डॉ. हरीश शेट्टी व ९ जून रोजी डॉ. राजेंद्र बर्वे मार्गदर्शन करणार आहेत. सध्या विविध क्षेत्रांतील करिअरच्या संधींमध्ये आमूलाग्र बदल घडून स्पर्धात्मक वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यशाळेतील ‘नव्या वाटा’ या सत्राअंतर्गत ‘युट्यूब – समाजमाध्यमे’ या विषयावर केतन जोशी, वित्तक्षेत्रातील संधींबाबत कौस्तुभ जोशी आणि एआय – कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत डॉ. भूषण केळकर मार्गदर्शन करणार आहेत. नवनवीन अभ्यासक्रम व विविध क्षेत्रांतील करिअरच्या संधींची ओळख विवेक वेलणकर करून देणार आहेत. कौशल्य विकास आणि त्यामधील विविध संधींबाबत महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे प्रतिनिधी पंकज तावडे मार्गदर्शन करणार आहेत. तर परदेशातील उच्च शिक्षणाच्या संधींबाबत बख्तावर कृष्णन व तरंग अग्रवाल संवाद साधतील. तसेच, विद्यार्थ्यांना या कार्यशाळेत कला क्षेत्रापासून विधी क्षेत्रांपर्यंत कोणकोणते अभ्यासक्रम उपलब्ध आहेत आदी विषयांबाबत इत्यंभूत माहिती तज्ज्ञांकडून दिली जाणार आहे.

हेही वाचा >>> आरटीई कायद्यातील दुरुस्तीनंतर दिलेल्या प्रवेशांना संरक्षण द्या; खासगी शाळांच्या संघटनेची उच्च न्यायालयात धाव

‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यशाळेत दोन्ही दिवस सारख्याच विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. यामुळे विद्यार्थी व पालक त्यांच्या सोयीनुसार कोणत्याही एका दिवसाची निवड करू शकतात. सदर कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच ऑनलाइन व प्रत्यक्ष पद्धतीने प्रवेशिका आरक्षित करण्याचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात आला आहे. या कार्यशाळेसाठी प्रवेश शुल्क अवघे ५० रुपये आहे.

तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि शंकानिरसनाची संधी

कधी ? शनिवार, ८ जून आणि रविवार, ९ जून रोजी

कुठे ? हॉटेल टीप टॉप प्लाझा, एल. बी. एस. मार्ग, ठाणे (पश्चिम)

केव्हा ?

सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत

ऑनलाइन पद्धतीने प्रवेशिका आरक्षित करण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या

८ जून : http://tiny.cc/LS_MargYashacha_8june

९ जून : http://tiny.cc/LS_MargYashacha_9june

प्रत्यक्ष पद्धतीने प्रवेशिका मिळण्याचे ठिकाण

‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यशाळेच्या प्रवेशिका ऑनलाइनसह प्रत्यक्ष पद्धतीनेही उपलब्ध करण्यात आल्या आहेत. ठाणे पश्चिमेकडील एल. बी. एस. मार्गावरील हॉटेल टीप टॉप प्लाझा आणि नौपाडा येथील गोखले मार्गावरील जीन्स जंक्शन येथे सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत प्रवेशिका उपलब्ध असतील.

मुख्य प्रायोजक – आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड

सहप्रायोजक – सोमय्या विद्याविहार युनिव्हर्सिटी, द सिव्हिलियन्स अकॅडमी, डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी, सिंहगड इन्स्टिट्यूट्स, लीला एज्युकेशन सोसायटी आचार्य इन्स्टिट्यूशन्स, पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी, पुणे</p>

बँकिंग पार्टनर – युनियन बँक ऑफ इंडियापॉवर्ड बाय – ज्ञानदीप अकॅडमी फॉर यू.पी.एस.सी. अँड एम.पी.एस.सी., पुणे , एस. आर. एम. युनिव्हर्सिटी, एपी, मंथन आर्ट स्कूल, भारत कॉलेज ऑफ इंजिनियरिंग कान्होर, बदलापूर (प.), विद्या प्रसारक मंडळ, ठाणे, शौर्य डिफेन्स अकॅडमी, ठाणे, इंदाला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स