‘शक्ती मिल’ सामूहिक बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन आरोपीविरुद्ध बालन्याय मंडळासमोर खटला चालविण्यात येणार असून प्रकरणासाठी विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला मंडळाच्या सदस्यांनीच विरोध दर्शविला आहे. त्यासंबंधीचे पत्रही सदस्यांनी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आणि गृहमंत्र्यांना पाठविले आहे. मंडळाच्या सदस्य बीना तेंडुलकर यांच्यासह राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिवांनी या संदर्भात पत्रव्यवहार करून निकम यांची नियुक्ती रद्द करण्याची मागणी केली आहे. मंडळासमोरील सुनावणीच्या वेळी निकम यांचे वागणे संयुक्त राष्ट्र संघाच्या बालहक्कांसंदर्भातील नियमांच्या विरोधात होते आणि अल्पवयीन आरोपीचे हक्क भंग करणारे होत, असा आरोप तेंडुलकर यांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा