मुंबई : राज्यातील शेतकरी, विद्यार्थी, महिला, बेरोजगार, उद्योजक या सर्वच घटकांना सरकारच्या चुकीच्या निर्णयाची झळ बसली आहे. परीक्षांमधील गोंधळामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. जातीजातींमध्ये भांडणे लावण्याचे काम या सरकारच्या काळात झाले आहे. पुण्यासह अनेक शहरे अमली पदार्थांच्या विळख्यात अडकली आहेत. प्रत्येक कामात दलाली घेतली जात आहे. अशा या सरकारला निरोप देण्याची वेळ आली आहे, अशी टीका करत चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घातल्याचे जाहीर केले.

पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षनेत्यांची बैठक पार पडली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार तर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली.

PM Narendra Modi in Haryana Election
पंतप्रधान मोदींनी उल्लेख केलेल्या ‘खर्ची’, ‘पर्ची’चा अर्थ काय? हरियाणा निवडणुकीत हा मुद्दा का गाजतोय?
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा…
Efforts by BJP and Shiv Sena Shinde group to make Ajit Pawar group leave the Grand Alliance and contest the assembly elections independently
अजित पवारांच्या एक्झिटसाठी चक्रव्यूह? भाजप-शिंदे गटाकडून आक्रमक रणनीती
uttar pradesh bypoll
UP Bypoll 2024 : समाजवादी पक्षाकडून काँग्रेसला दोन जागांचा प्रस्ताव; काँग्रेस पाचवर ठाम; जागावाटपावरून दोन्ही पक्षांत मतभेद?
cm eknath shinde led mahayuti alliance face reservation issue ahead of assembly elections
मराठा, ओबीसी, धनगर, आदिवासी सर्व समाजांना चुचकारताना मुख्यमंत्र्यांची कसोटी, निवडणुकीच्या तोंडावर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
Haryana Assembly Election
Haryana Assembly Election : भाजपाचं हरियाणात धक्कातंत्र; दोन मंत्र्यांसह सात आमदारांचा पत्ता कट, तिकीट न मिळालेल्यांमध्ये नाराजी?
TMC MP Jawhar Sircar
TMC MP Jawhar Sircar : तृणमूल काँग्रेस अन् खासदारकीचा राजीनामा देण्याचं कारण काय? जवाहर सरकार यांनी केलं मोठं भाष्य
bjp strategy for hung assembly in jammu and kashmir after election
काँग्रेस- एनसी आघाडीला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न; त्रिशंकू विधानसभेत भाजपचे सरकार?

हेही वाचा >>> Maharashtra MLC Polls : कोकण पदवीधर मतदारसंघासाठी सुमारे ७० टक्के मतदान

शेतकरी, विद्यार्थी, कामगार, उद्योजक आदी सर्वच आघाड्यांवर हे सरकार अपयशी ठरले आहे. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना हमीभाव दिला गेला नाही. पीकविमाच्या नावाने विमा कंपन्यांनी प्रचंड पैसा कमविला. शेतकऱ्याच्या बियाणे, खत, अवजारे यांना जादा जीएसटी आकारण्यात आला आहे. केंद्र आणि राज्य या दोन्ही सरकारने राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. त्यामुळे अशा नतभ्रष्ट, भ्रष्टाचारी सरकारच्या चहापानाला जाण्याचे टाळल्याचे विरोधी नेत्यांनी जाहीर केले.

लोकसभा निवडणुकीत फटका

लोकसभा निवडणुकीत जनाधार गमावलेले हे सरकार असून हुकूमशाही फार काळ टिकत नाही हे जनतेने दाखवून दिले आहे असे वडेट्टीवार यांनी सांगितले. राज्यातील शेतकऱ्यांचा आवाज केंद्रातील सरकारसमोर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी का मांडला नाही या प्रश्नांचे उत्तर सरकारला या अधिवेशनात द्यावे लागणार आहे. शेतकऱ्यांच्या विम्याचे पैसे मिळत नाहीत पण विमा कंपन्यांनी मात्र या योजनेत खूप पैसे कमिवले आहेत. या सरकारची मानसिका शेतकऱ्याला उद्ध्वस्त करण्याची आहे, असे वडेवट्टीवार यांनी सांगितले.