मुंबई : लोकसभेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत दक्षिण मध्य मुंबई मतदारसघाच शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी चुरशीची लढत झाली. शिवसेनेने (उद्धव ठाकरे) या मतदारसंघातून अनिल देसाई यांना रिंगणात उतरविले होते. तर शिवसेने (एकनाथ शिंदे) खासदार यांना पुन्हा एकदा या मतदारसंघातून संधी दिली. उभयतांमध्ये चुरशीची लढत झाली. मात्र धारावीकरांनी शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) झोळीत मतांचे दान टाकल्याने अनिल देशमुख यांच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. वडाळा, माहीम, शीव कोळीवाडा, धारावी, चेंबूर, अणुशक्ती नगर या सहा विधानसभा मतदारसंघांचा दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात समावेश होतो. धारावी पुनर्विकास प्रकल्प, शीव कोळीवाडा परिसरातील काँग्रेसमधील अंतर्गत वाद आदी विविध कारणांमुळे अनेकांचे लक्ष या मतदारसंघांतील निकालांकडे लागले होते. त्याचबरोबर विधानसभेच्या सलग आठ निवडणुकांमध्ये विजयी झालेले कालिदास कोळंबकर पुन्हा विजयश्री खेचून आणणार का, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे, शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) सदा सरवणकर आणि शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) महेश सावंत यांच्यामध्ये होणारी लढत याकडेही अनेकांच्या नजरा लागल्या होत्या. त्यामुळे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील धारावी, शीव कोळीवाडा, माहीम, वडाळा विधानसभा मतदारसंघ लक्षवेधी ठरले होते. त्याबाबत घेतलेला हा आढावा.

काही महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचा खासदार निवडून देणाऱ्या दक्षिण मध्य मुंबईत वडाळा, धारावी वगळता इतर मतदारसंघांमध्ये मताधिक्याबाबत उलटफेर पहायला मिळाले. माहीम, चेंबूर, अणुशक्ती नगर, शीव कोळीवाडा विधानसभा मतदारसंघांमध्ये लोकसभा निवडणुकीतील मतदानाच्या विरुद्ध कौल जनतेने दिला. दुसरीकडे वडाळा विधानसभा मतदारसंघांतून नऊ वेळा निवडून येऊन भाजपच्या कालिदास कोळंबकर यांनी नवा विक्रम केला, तर धारावीची जागा गायकवाड कुटुंबियांना राखण्यात यश आले आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा…मुख्यमंत्रीपदावरून पेच; शिंदेंची मनधरणी करण्याचा प्रयत्न? शपथविधीचा मुहूर्त लांबणीवर पडण्याची शक्यता

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे माहीम मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष केंद्रीत झाले होते. त्यातच भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडूनही मदतीचे आश्वासन अमित ठाकरेबाबत मिळाली होते. त्याशिवाय तीन वेळा माहीममधून निवडणूक जिंकलेले शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) मातब्बर नेते सदा सरवणकर रिंगणात होते. विशेष म्हणजे लोकसभा निडणुकीत या मतदारसंघात महायुतीला १३ हजार ९९० मताधिक्य मिळाले होते. पण विधानसभा निवडणुकीत स्थानिक पातळीवर सक्रिय असलेले व दांडगा जनसंपर्क असलेले शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) महेश सावंत यांनी दोन्ही मोठ्या बड्या उमेदवारांना धूळ चारली. ते १३१६ मतांनी निवडून आले. मनसे व शिंदे गटात मतविभाजन झाल्याचाही फटका शिवसेनेला (एकनाथ शिंदे) बसल्याचा आरोपही स्थानिक कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.

चेंबूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल देसाई यांना लोकसभा निवडणुकीत तीन हजारांचे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे हा मतदारसंघ महाविकास आघाडीचे उमेदवार प्रकाश फातर्पेकर यांच्यासाठी अनुकूल मानला जात होता. पण महायुतीमधील घटकपक्ष शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) माजी आमदार आणि उमेदवार तुकाराम काते यांनी तब्बल १० हजार ७११ मतांनी त्यांचा पराभव केला. भाजपसोबत युतीचा मोठा फायदा शिवसेनेला (एकनाथ शिंदे) झाल्याचे दिसून आले. धारावी विधानसभा मतदारसंघ राखण्यात गायकवाड कुटुंबियांना यश आले आहे. धारावी मतदारसंघातून डॉ. ज्योती गायकवाड विजयी झाल्या.

हेही वाचा…रश्मी शुक्ला पुन्हा पोलीस महासंचालकपदी; गृह विभागाकडून मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव

नाराजीचा फटका

शीव कोळीवाडा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे कॅप्टन आर तामिळ सेल्वन यांनी सलग तिसऱ्यांदा चुरशीच्या लढतीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत त्यांना एकूण ७३ हजार ४२९ मते मिळाली. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार गणेशकुमार यादव यांचा ७८९५ मतांनी पराभव केला. शीव कोळीवाडा मतदारसंघातील उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये धुसफूस सुरू होती. काँग्रेसने गणेशकुमार यादव यांना उमेदवारी दिल्यानंतर मुंबई महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेतेपद भूषविलेले रवी राजा यांनी नाराजी व्यक्त केली. अखेर रवी राजा यांनी काँग्रेसबरोबर काडीमोड घेत भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे काँग्रेसमधील बहुसंख्य कार्यकर्ते नाराज झाले होते. या नाराजीचा काँग्रेसला फटका बसला.

नऊ वेळा विजय

ज्योती गायकवाड यांनी शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) राजेश खंदारे यांचा पराभव केला. ज्योती गायकवाड यांनी शिंदे गटाच्या राजेश खंदारे यांचा २३ हजार ४५९ मतांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. खासदार व मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी बहिणीला निवडणूक आणण्यासाठी फक्त धारावी मतदारसंघातच लक्ष केंद्री केले होते. त्याचा फटका काँग्रेसला मुंबईतील अन्य मतदारसंघात बसल्याची टीका होऊ लागली आहे. वडाळ्यात आमदार कालिदास कोळंबकर यांनी सलग नऊ वेळा विजय मिळवून विक्रम केला.

Story img Loader