शासनाने गॅस सिलेंडरच्या संख्येवर मर्यादा घातल्यानंतर व्यापारी आणि कंपन्यांनी अनेकविध विद्युत शेगडय़ा बाजारात आणल्या आहेत. या शेगडय़ांचे महत्त्व थेट लोकांच्या घरापर्यंत जाऊन पटवून देण्याचा प्रयत्नही केला जात आहे.
त्यामुळे काळ्या बाजारातील रॉकेलचे वाढलेले भाव आणि मर्यादित सिलेंडरला पर्याय म्हणून विजेच्या शेगडय़ांची बाजारपेठ आता मूळ धरू लागली आहे.
मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात आजमितीला ५०,२८,७७१ घरगुती गॅसग्राहक आहेत. मात्र, गॅस सिलेंडवर आलेल्या संख्येच्या मर्यादेमुळे ते ‘गॅस’वर असताना विविध कंपन्यांनी विजेच्या शेगडय़ांचा पर्याय आणला आहे.
या शेगडय़ांना झोपडपटय़ा आणि अल्प उत्पन्न गटातील लोकांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. काळ्या बाजारात रॉकेल ५० रुपयांहून अधिक झाल्याने परवडत नाही. त्यातच ते वेळेवर उपलब्ध होण्याची शक्यताही कमी असते. अशा परस्थितीत वीज तुलनेत कमी पैशात २४ तास उपलब्ध असते. स्वाभाविकच विजेच्या शेगडय़ांची लोकप्रियता वाढत आहे. नेहमीप्रमाणेच चिनी कंपन्यांनी या क्षेत्रातही मुसंडी मारली आहे. त्यांच्या किमती २५० रुपयांपासून ते तीन हजार रुपयांपर्यंत आहेत. वीजचोरी संदर्भातील दक्षता पथकांच्या निदर्शनास अशा गोष्टी आल्या तर कायदेशीर कारवाई होऊ शकते, असे रिलायन्स एनर्जीचे प्रवक्ते विवेक देवस्थळी यांनी सांगितले.     

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा