मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिल्यानंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यास मंगळवारपासून सुरुवात केली. यासाठी विभागनिहाय कार्यकरी अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली असून आवश्यक ती यंत्रणाही उभी करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पावसाळा सुरू होताच मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरते. खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनतो. दरवर्षी रस्त्यांवर खड्डे पडतात आणि त्यावरून प्रशासनावर टीका होते. मात्र खड्डे बुजविण्यासाठी कोणतेही ठोस उपाय होताना दिसत नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खड्डे बुजविण्याची जबाबदारी एमएमआरडीए आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळावर (एमएसआरडीसी) सोपविली आहे. एमएमआरडीए आणि एमएसआरडीसीने २४ तास खड्डे बुजविण्याचे काम करण्याच्या दृष्टीने यंत्रणा उभारावी आणि कामाला सुरुवात करावी, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी शनिवारी दिले.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार एमएमआरडीएने विभागनिहाय कार्यकरी अभियंत्यांची नियुक्ती केली आहे. या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि देखरेखीखाली मंगळवारपासून मुंबई तसेच मुंबई महानगर परदेशातील खड्डे बुजविण्यास सुरुवात करण्यात आल्याची माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. मुंबईतील पश्चिम आणि पूर्व द्रुतगती मार्गासह एमएमआरडीएचे प्रकल्प सुरू असलेल्या परिसरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात येणार आहेत. तर दुसरीकडे एमएमआरमधील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासही मंगळवारपासून सुरुवात करण्यात आली. एमएमआरमध्ये सर्वाधिक खड्डे असून येथील खड्डे बुजविण्याचे मोठे आव्हान असेल, असे एमएमआरडीएतील अधिकाऱ्याने दिली.