शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी महापालिका आयुक्त आर. ए. राजीव यांच्याविरोधात विशेषाधिकार भंगाची सूचना केली होती. या संदर्भात, राज्य शासनाच्या विधी विभागाने नुकतीच राजीव यांना नोटीस पाठविली असून येत्या २१ जानेवारीपर्यंत या प्रकरणाचा लेखी खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.
घोडबंदर भागात विहंग व्हॅली गृह प्रकल्प सुरू असून आमदार सरनाईक त्याचे विकासक आहेत. या गृह प्रकल्पासाठी चोरून पाणी घेतल्याचा आरोप महापालिका प्रशासनाने केला होता. मात्र, हे आरोप फेटाळून लावत सरनाईक यांनी आयुक्त राजीव यांच्याविरोधात विशेषाधिकार भंगाची सूचना केली होती. त्यामध्ये आयुक्त राजीव यांच्या आदेशावरून पाणी खात्याच्या अधिकाऱ्यांनी आमच्या कंपनीवर पाणीचोरीचा खोटा गुन्हा कासारवडवली पोलीस ठाण्यात दाखल केला आहे, असे सरनाईक यांनी म्हटले होते. या संदर्भात, राज्याच्या विधी विभागाने राजीव यांना नोटीस पाठवून येत्या २१ जानेवारीपर्यंत या प्रकरणाचा लेखी खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा