लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : यंदापासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी सुरू झाली आहे. मात्र त्याच्या अंमलबजावणीसाठी विद्यापीठाच्या विविध विभागांमधील तब्बल ६१ टक्के पदे रिक्त आहेत. एकूण ३६८ मंजूर पदांपैकी २२६ पदे रिक्त असून अवघ्या १४२ प्राध्यापकांवर विद्यापीठाच्या विभागांचा कारभार सुरु आहे.

11 thousand 500 students passed ca final examination conducted in November 2024 Mumbai
‘सीए’ अभ्यासक्रमाच्या परीक्षेचा निकाल जाहीर, ११ हजार ५०० विद्यार्थी ‘सीए’ म्हणून पात्र
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
students failed in 5th and 8th standard in maharashtra
राज्यात पाचवी, आठवीचे किती विद्यार्थी अनुत्तीर्ण?
teacher lost 20 lakh rupees share market
शिक्षकाला वीस लाखांचा गंडा, सुरतचे तीन आरोपी गजाआड; बुलढाणा सायबरची कारवाई
teachers Adjustment , Group Education Officer,
शिक्षकांच्या प्रतिनियुक्तीची चौकशी, जव्हारच्या प्रभारी गटशिक्षण अधिकारी यांच्या काळात समायोजन
mpsc students loksatta news
राज्यसेवा २०२४च्या जागावाढीसाठी विद्यार्थ्यांचे सरकारला साकडे, तहसीलदारासह अनेक पदे रिक्त
MPSC GR
MPSC च्या विद्यार्थ्यांना खूशखबर! कमाल वयोमर्यादेत वाढ; राज्य सरकारच्या जीआरमध्ये नेमकं काय म्हटलंय?
Promotion Kalyan Dombivli Municipal corporation,
कल्याण डोंबिवली पालिकेतील ३४३ कर्मचाऱ्यांना पदोन्नत्ती

सध्या विद्यापीठातील विविध ३४ विभागांमध्ये शासनाकडून प्राध्यापकांची ८७, सहाय्यक प्राध्यापकांची १२१ आणि सहयोगी प्राध्यापकांची १६० पदे मंजूर आहेत. त्यापैकी प्राध्यापकांची १५ पदे भरली असून ७२ पदे रिक्त आहेत. सहाय्यक प्राध्यापकांची ४० पदे भरली असून ८१ पदे रिक्त आहेत. तर सहयोगी प्राध्यापकांची ८७ पदे भरलेली असून ७३ पदे रिक्त आहेत. तर समाजशास्त्र, राज्यशास्त्र, आफ्रिकन स्टडीज, युरेशियन स्टडीज, स्टॅटिस्टिक्स, मानसशास्त्र, विधी, संस्कृत, भाषाशास्त्र, रशियन, अरेबिक, पर्शियन, हिंदी, शिक्षणशास्त्र, सिंधी, भूगोल, संगीत, कन्नड, वाणिज्य, उर्दू आणि प्रा. बाळ आपटे केंद्र या २१ विभागांमध्ये प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. माजी अधिसभा सदस्य संजय वैराळे यांनी माहिती अधिकारांतर्गत विचारलेल्या प्रश्नांमधून विद्यापीठाची ही स्थिती उघड झाली आहे.

आणखी वाचा- मुंबई: दादर-धुळे आणि दादर-मनमाड एक्सप्रेसला एलएचबी डबे

मुंबई विद्यापीठात सर्वसमावेशक असे शिक्षण देऊन गुणवत्तापूर्ण विद्यार्थी तयार झाले पाहिजेत. मोठ्या स्तरावर संशोधन होणेही गरजेचे आहे. विविध विभागांमध्ये मंजूर पदांपैकी अनेक पदे रिक्त असल्यामुळे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणार कशी? मुंबई विद्यापीठात विविध राज्यातून तसेच परदेशातून मोठ्या संख्येने विद्यार्थी शिकण्यासाठी येतात. परंतु विद्यापीठाचा दिवसेंदिवस खालावणारा दर्जा पाहून या विद्यार्थीसंख्येत घट होत आहे, असे मत वैराळे यांनी व्यक्त केले.

पदभरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात

मुंबई विद्यापीठाच्या विविध विभागातील १३६ शिक्षकीय पदे भरती करण्यास शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. सदर पदभरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, असे मुंबई विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले.

आणखी वाचा- मुंबई: अखेर कोनमधील २,४१७ घरांच्या दुरुस्तीला सुरुवात

मुंबई विद्यापीठातील काही विभागनिहाय पदभरतीची स्थिती

विभाग – मंजूर पदे – भरलेली पदे – रिक्त पदे
अर्थशास्त्र – २५ – ९ – १६
समाजशास्त्र – १६ – ६ – १०
राज्यशास्त्र – १४ – ६ – ८
संख्याशास्त्र – १० – ३ – ७
मानसशास्त्र – १६ – ४ – १२
विधी – १५ – ६ – ९
संस्कृत – ५ – ३ – २
गणित – २० – ११ – ९
रसायनशास्त्र – २६ – १२ – १४
भौतिकशास्त्र- २८ – १० – १८
मराठी – ८ – ५ – ३
इतिहास – १९ – ९ – १०
भूगोल – २० – ७ – १३
जीवशास्त्र – ११ – ५ – ६
उर्दू – ८ – १ – ७
तत्वज्ञान – १५ – ८ – ७

Story img Loader