मुंबई : जुनी निवृत्ती वेतन योजना तातडीने लागू करण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारी – निम सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघाने मंगळवारपासून पुकारलेल्या संपाचा रुग्णसेवेवर अल्प परिणाम झाला आहे. रुग्णालयांतील बाह्यरुग्ण विभागातील सेवा सुरळीत असली तरी आंतर रुग्ण विभागातील सेवा आणि शस्त्रक्रियेवर परिणाम झाल्याचे निदर्शनास आले.

जुनी निवृत्ती वेतन योजना तातडीने लागू करावी, सरकारच्या विविध विभागांतील रिक्त पदे भरण्यात यावी, तसेच सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे, यासह विविध मागण्यांसाठी राज्य कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या या संपात आरोग्य कर्मचारीही सहभागी झाले आहेत. परिचारिका, तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी या संपात सहभागी झाल्याने आंतर रुग्ण सेवेवर परिणाम झाला आहे. बाह्यरुग्ण विभागात विभागप्रमुख, प्राध्यापक, निवासी डॉक्टर रुग्णसेवा सुरळीत राहावी यासाठी प्रयत्न करीत होते. संपामुळे बाह्यरुग्ण विभागात तुरळक गर्दी होती. तसेच जे. जे. रुग्णालयातील ५० बदली कर्मचारी संपात सहभागी न झाल्याने रुग्णसेवा पुरविणे रुग्णालय प्रशासनाला शक्य झाले. त्याचप्रमाणे अन्य रुग्णालयांतील काही कर्मचारी संपात सहभागी न झाल्याने बाह्यरुग्ण आणि अतिदक्षता विभागातील सेवेवर फारसा परिणाम झाला नाही.

pune Penal action against two senior officers for facilitating bogus payments at Jijamata Hospital
पिंपरी : मानधनाची २१ लाखांची बोगस बिले लाटली; दाेन वैद्यकीय अधिकाऱ्यांवर पाचशे रुपये…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Health Department provided assistance to 2 5 lakh critically ill patients mumbai news
आरोग्य विभागाने अडीच लाख दुर्धर आजाराच्या रुग्णांना दिला मदतीचा हात! पॅलिएटीव्ह सेवेचा करणार विस्तार…
account wise inquiry started against clerk in case of corruption in Jijamata Hospital of Municipal Corporation in Pimpri
पिंपरी : जिजामाता रुग्णालयातील रकमेचा अपहार; लिपिकाची खातेनिहाय चौकशी
43 ministers maharashtra
विश्लेषण : महाराष्ट्रात ४३ मंत्रीच? मंत्रिमंडळात मंत्र्यांची संख्या किती असते? या संख्येवर बंधने का असतात?
Robotic assisted Surgery at Fortis Hospital
हृदयविकाराच्या रुग्णावर केली रोबोटिक गॉलब्लॅडर शस्त्रक्रिया!
What is the National Health Claim Exchange health insurance
आरोग्य विम्याची प्रक्रिया आता जलद? काय आहे ‘नॅशनल हेल्थ क्लेम एक्स्चेंज’?
insurance, Dharavi, 10 crore medical insurance Dharavi,
धारावीतील ३०० हून अधिक रहिवाशांना १० कोटी रुपयांचा वैद्यकीय विमा

हेही वाचा – ‘मेट्रो ५’ मार्गिकेवरील कशेळी कारशेडच्या कामाला लवकरच सुरुवात; हैदराबादमधील कंपनीला कंत्राट?

सेंट जॉर्जेस रुग्णालय, कामा रुग्णालयात अतिमहत्त्वाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तातडीच्या नसलेल्या काही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र जे. जे. रुग्णालयामध्ये एकही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली नसल्याची माहिती जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी दिली. दरम्यान, संप १०० टक्के यशस्वी झाला असून, कोणताही तृतीय आणि चतुर्थश्रेणी कर्मचारी, तसेच परिचारिका कामावर हजर झाल्या नसल्याची माहिती जे. जे. चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष काशिनाथ राणे यांनी दिली. तर जोपर्यंत सरकारकडून ठोस निर्णय घेण्यात येत नाही, तोपर्यंत संप मागे घ्यायचा नाही, असा निर्धार राज्य कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी जी. टी. रुग्णालयात कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.

महानगरपालिकेच्या रुग्णालयासाठी परिचारिका, कर्मचारी घेणार

संपाच्या पहिल्या दिवशी योग्य नियोजन करून रुग्ण सेवेवर फारसा परिणाम होऊ दिला नाही. मात्र संप बेमुदत असल्याने मुंबई महानगरपालिकेतील परिचारिका आणि चतुर्थश्रेणी कर्मचारी उपलब्ध व्हावेत यासाठी मुंबई महानगरपालिका रुग्णालयाच्या संचालक डॉ. नीलम अंद्राडे यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्याबाबत त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत कर्मचारी उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे संप सुरू राहिल्यास महानगरपालिकेकडून आणखी कर्मचारी घेण्यात येतील, अशी माहिती जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी दिली.

हेही वाचा – साई रिसॉर्ट प्रकरण: अनिल परब यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा

नवीन रुग्ण आणि महत्त्वाच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णांना महानगरपालिकेच्या रुग्णालयात पाठवावे, असे राज्य सरकारच्या रुग्णालयांना कळविण्यात आले आहे. तसेच जे. जे. रुग्णालयामध्ये पहिल्या दिवशी प्रत्येक पाळीमध्ये १० परिचारिका पाठविण्यात आल्या आहेत. तसेच शिकाऊ परिचारिका आणि आरोग्य सेवक, सफाई कामगार यांनाही अन्य रुग्णालयांमध्ये पाठविण्यात येणार आहे. तसेच सेंट जॉर्जेस रुग्णालय, कामा रुग्णालय आणि जी. टी. रुग्णालयाच्या मागणीनुसार कर्मचारी पाठविण्यात येतील, असे डॉ. नीलम अंद्राडे, संचालक, मुंबई महानगरपालिका रुग्णालये यांनी सांगितले.

Story img Loader