नाशिकहून पाहुणा म्हणून आलेल्या एका व्यक्तिने नजरचुकीने दुसऱ्याच घरात प्रवेश करून पाणी पिण्याचा बहाणा करून एका महिलेचा विनयभंग केला असल्याची घटना कल्याण पश्चिमेतील पुण्योदय पार्क परिसरात घडली आहे.
पोलिसांनी सांगितले, अतुल बाबुराव वाकोडे (वय ३६) अशी अटक आरोपीचे नाव आहे. गुरूवारी संध्याकाळी अतुल पुण्योदय पार्कमधील आपल्या नातेवाईकाकडे पाहुणा म्हणून आला होता. त्याने नजरचुकीने दुसऱ्याच घरात प्रवेश केला. तेथील उपस्थित महिलेकडे अतुलने पाणी मागण्याचा बहाणा करून त्या महिलेचा विनयभंग केला. बाजारपेठ पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader