मुंबई : देशभरात गतवर्षांत अतिवृष्टी, पूर, भूस्खलन, वीज पडणे, उष्णतेच्या लाटा, थंडीच्या लाटा आणि गारपीट आदी हवामान प्रकोपाच्या घटनांमध्ये २४०० लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी १ हजार २८० हून अधिक जणांचा वीजपडून आणि वादळी वाऱ्यामुळे मृत्यू झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हवामान विभागाच्या वार्षिक अहवालातील माहितीनुसार, गतवर्षांत अतिवृष्टी, अतिवृष्टीमुळे आलेले पूर, महापूर. भूस्खलन, वीज पडणे, उष्णतेच्या लाटा, थंडीच्या लाटा आणि गारपिटीच्या घटनांमध्ये देशभराचत २ हजार ४०० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी १ हजार २८० जणांचा मृत्यू वीज पडून आणि वादळांमुळे झाला आहे. त्या खालोखाल अतिवृष्टी आणि पूर, उष्णतेच्या लाटा, चक्रीवादळे आणि हवामान विषयक अन्य घटनांमध्ये २ हजार ४०० जणांचा मृत्यू झाला आहे. बिहार, केरळ, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश ही राज्यांत हवामान प्रकोपामुळे सर्वांधिक जिवितहानी झाली आहे.

हेही वाचा…पश्चिम रेल्वेवर शयनयान वंदे भारतची चाचणी यशस्वी

दरम्यान मार्च, एप्रिल, मे आणि जून महिन्यांत देशातील अनेक ठिकाणी उष्णतेच्या झळांचा सामना करावा लागला. मार्च महिन्यात सहा दिवसांत हवामान विभागाच्या १५ उप विभागात उष्णतेच्या झळा जाणविल्या. एप्रिल महिन्यात पहिले आठ दिवस आणि शेवटचे पंधरा दिवस, असे एकूण २३ दिवस उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागला. या २३ दिवसांत हवामान विभागाच्या १५८ उप विभागात उष्णतेच्या झळा जाणविल्या. मे महिन्यात ११, १२, १३ आणि १४ मे हे चार दिवस वगळता सर्व महिनाभर उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागला. मे महिन्यात हवामान विभागाच्या २२५ उप विभागात उष्णतेच्या झळा जाणविल्या. जून महिन्यात एकूण २२ दिवस उष्णतेच्या झळांचा सामना करावा लागला. या २२ दिवसांत हवामान विभागाच्या १८० उप विभागात उष्णतेच्या झळा जाणविल्या.

हेही वाचा…मोठ्या कंपन्या व विकासकांकडे कोट्यवधीचा मालमत्ता कर थकीत, एमएसआरडीसीने थकवला मालमत्ता कर

राज्यात अति पावसाच्या घटना वाढल्या

गतवर्षांत राज्यात अति पावसाच्या घटना वाढल्या आहेत. २१ जुलै रोजी चंद्रपुरात १३५.८ मिमी, डहाणूत ७ जुलै रोजी १९३ मिमी, हर्णेत ८ ऑगस्ट रोजी १७२.४ मिमी, महाबळेश्वरात २५ जुलै रोजी ३३०.१ मिमी, कुलाब्यात २६ सप्टेंबर रोजी १६९.२ मिमी, नागपूर विमानतळवर २१ जुलै रोजी १६४ मिमी. पुण्यात २६ सप्टेंबर रोजी १३३ मिमी आणि रत्नागिरीत १३ जुलै रोजी १८२.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. देशात सर्वांधिक पावसासाठी प्रसिद्ध असलेल्या चेरापुंजी येथे ३० मे २०२४ रोजी २४ तासांत ६३४ मिलीमीटर इतक्या सर्वांधिक पावसाची नोंद झाली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Over 2400 people died in extreme weather events like floods heatwaves and landslides mumbai print news sud 02