लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : मुंबईत चालू वर्षात, २०२३ मध्ये तब्बल एक लाख २६ हजार ९०५ घरांची विक्री झाली आहे. या घरविक्रीच्या माध्यमातून राज्य सरकारला १० हजार ८६० कोटींचा महसूल मुद्रांक शुल्क वसुलीतुन मिळाला आहे. डिसेंबरमध्ये १२ हजार २५५ घरांची विक्री झाली असून या घरविक्रीतून ९३१ कोटींचा महसूल राज्य सरकारला मिळाला आहे.

करोनानंतर मोठ्या संख्येने ग्राहक हक्काच्या आणि मोठ्या घरांकडे वळू लागले आहेत. त्यामुळे घरविक्रीत वाढ होताना दिसत आहे. २०१३ ते २०२० पर्यंत ६४ हजार ते ८० हजार दरम्यान घरविक्री झाली आहे. पण करोनानंतर अर्थात २०२१ पासून घरविक्रीने एक लाखाचा टप्पा पार करण्यास सुरु केला असून आता २०२३ मध्ये सव्वा लाखांहुन अधिक घरांची विक्री झाली आहे. एकूणच २०२३ मधील घरविक्री ही आतापर्यंतची सर्वाधिक आणि विक्रमी घरविक्री ठरली आहे.

आणखी वाचा-मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; पोलिसांकडून कसून तपास सुरू, फोन करणाऱ्याची माहिती…

वर्षभराचा विचार करता डिसेंबरमधील घरविक्री ही या वर्षातील दुसऱ्या क्रमांकांची सर्वाधिक घरविक्री आहे. मार्च २०२३ मध्ये १३ हजार १५१ घरे विकली गेली होती आणि त्यातून १२२५ कोटींची मुद्रांक शुल्क वसुली झाली होती. आता डिसेंबर २०२३ मध्ये घरविक्रीने १२ हजारचा टप्पा पार केला आहे. २०१३ ते २०२३ वर्षातील डिसेंबरमधील घरविक्रीचा विचार करता दहा वर्षातील डिसेंबरमधील ही दुसरी सार्वधिक विक्री आहे. २०२० मध्ये डिसेंबरमध्ये १९ हजार ५८१ अशी विक्रमी घरविक्री झाली होती. त्यानंतर आता डिसेंबर २०२३ मध्ये १२ हजार २५५ घरांची विक्री झाली आहे. २०२० आणि २०२३ वगळता मागील दहा वर्षात डिसेंबर मध्ये पाच हजार ते नऊ हजार दरम्यान घरविक्री राहिली आहे. एकूणच २०२३ च्या डिसेंबरमध्ये आणि एकूण २०२३ या वर्षात घरविक्रीत मोठी वाढ झाली आहे. ही बाब बांधकाम व्यवसायाला चालना देणारी ठरणार आहे.

चालू २०२३ वर्षातील घरविक्री ही मागील दहा-अकरा वर्षातील सर्वाधिक आणि विक्रमी घरविक्री झाली आहे. घरविक्रीतील ही वाढ उल्लेखनीय असून बांधकाम व्यवसायाला दिलासा देणारी आहे. परवडणाऱ्या घरांची वाढती मागणी आणि त्या तुलनेत अशा घरांची उपलब्धी यामुळे घरविक्रीत वाढ होताना दिसते आहे. तेव्हा आता येणाऱ्या वर्षातही घरविक्री वाढती राहील अशी अपेक्षा आहे. -शिशिर बैजल, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, नाईट फ्रँक

आणखी वाचा-एअर कार्गोतून बेडशिटच्या नावाखाली परदेशी सिगारेटची तस्करी; १६ लाख परदेशी सिगारेट जप्त, दलालाला अटक

कोणत्या वर्षी किती घरांची विक्री

२०१३ – ६४ हजार २४२
२०१४ – ६३ हजार ६३६
२०१५ – ६७ हजार ४००
२०१६ – ६३ हजार २५५
२०१७ – ६७ हजार ६५९
२०१८ – ८० हजार ७४६
२०१९ – ६७ हजार ८६३
२०२० – ६५ हजार ६३३
२०२१ – १ लाख ११ हजार ९१३
२०२२ – १ लाख २२ हजार ३५ २०२३ – १ लाख २६ हजार ९०५

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Over half a million houses sold in mumbai in a year mumbai print news mrj
Show comments