(

मुंबई : ‘क्षयरोग मुक्त भारत’ या अभियानांतर्गत राज्यामध्ये सप्टेंबरपासून नागरिकांचे बीसीजी लसीकरण करण्यास सुरूवात झाली आहे. लसीकरण माेहिमेला सुरुवात झाल्यापासून दोन महिन्यांमध्ये राज्यातील १२ लाख ३० हजार ३६२ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. मात्र मुंबई महानगरपाालिकेच्या आरोग्य सेविका वारंवार आंदोलन करत असल्याने मुंबईमध्ये लसीकरण मोहिमेला अद्याप सुरुवात झालेली नाही.

nawab malik son in law sameer khan passed away
नवाब मलिक यांच्या जावयाचे निधन; काही दिवसांपूर्वी झाला होता गंभीर अपघात, निवडणूक काळात कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
AMit Thackeray Prasad lad
“भाजपा अमित ठाकरेंचाच प्रचार करणार”, प्रसाद लाडांकडून भूमिका स्पष्ट; म्हणाले, “सरवणकरांना विधान परिषदेवर…”
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Economic decline state government Sharad Pawar Vijay Wadettiwar criticize the government
आर्थिक घसरणीवरून राज्य सरकार लक्ष्य! शरद पवार, विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२५ पर्यंत ‘क्षयरोग मुक्त भारत’ करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार देशभरामध्ये क्षयरोगा विरोधात व्यापक मोहीम हाती घेण्यात आली असून, राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये १८ वर्षांवरील प्रत्येक नागरिकांना बीसीजी लस देण्यात येत आहे. राज्यात ३ सप्टेंबर २०२४ रोजी सुरू झालेल्या या क्षयरोग विरोधी मोहिमेला राज्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागील दोन महिन्यांमध्ये मुंबई वगळता राज्यातील १२ लाख ३० हजार ३६२ नागरिकांना बीसीजी लस देण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक २ लाख ७ हजार ७९५ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्याखालोखाल सांगली ग्रामीण भागामध्ये १ लाख १० हजार ९१९ नागरिक, धुळ्यामध्ये ९० हजार ६५७ आणि पुण्यामध्ये ७० हजार २७७ नागरिकांना बीसीजी लस देण्यात आली आहे.

हेही वाचा >>> “भाजपा अमित ठाकरेंचाच प्रचार करणार”, प्रसाद लाडांकडून भूमिका स्पष्ट; म्हणाले, “सरवणकरांना विधान परिषदेवर…”

‘क्षयराेग मुक्त भारत’ या अभियानांतर्गत बीसीजी लस देण्यात येणाऱ्या नागरिकांची पुढील तीन वर्षे नियमित तपासणी करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिक आणि आजारी रुग्णांचा क्षयरोगापासून बचाव करणे आणि लशीचा ज्येष्ठ नागरिकांवर किती परिणाम होतो ते तपासणे हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट असल्याची माहिती राज्य क्षयरोग निर्मूलन विभागातील अधिकाऱ्याने दिली.

हेही वाचा >>> Mahim assembly seat: “बाळासाहेबांनी कधीच निवडणूक लढविली नव्हती, राज ठाकरेंनी…”, माहीम विधानसभेबाबत सदा सरवणकर काय म्हणाले?

मुंबईतील १० लाख नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट

मुंबई महानगरपालिकेच्या २४ प्रभागांमध्ये नागरिकांना बीसीजी लस देण्यात येणार आहे. मात्र मुंबईतील आरोग्य सेविका वारंवार आंदोलन करत असल्याने क्षयरोगाच्या सर्वेक्षणाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे मुंबईमध्ये लसीकरण मोहिमेला सुरुवात झालेली नाही. मुंबई महानगरपालिकेने १८ वर्षांवरील सहा अति जोखीम असलेल्या गटांची निवड केली आहे. या गटातील १० लाख लोकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने ठेवले असल्याचे मुंबई महानगरपालिकेतील एका अधिकाऱ्याने सांगितले.

लसीकरणासाठी या वर्गाची निवड

– पाच वर्षांपासून क्षयरोग बाधित

– तीन वर्षांपासून घरातील क्षयरोग रुग्णांच्या संपर्कात

– मधुमेह रुग्ण

– धूम्रपान करणारी व्यक्ती

– कुपोषित व्यक्ती

– ६० वर्षांवरील नागरिक

Story img Loader