मुंबई : भायखळ्याच्या राणी बागेत नवनवीन प्राण्यांचा समावेश झाल्यानंतर पुन्हा एकदा पर्यटकांची गर्दी वाढू लागली असून रविवारी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी गर्दीचे सगळे विक्रम मोडीत निघाले. दिवभरात ३२ हजाराहून अधिक पर्यटकांनी राणीबागेला भेट दिली. अखेर पाउणेपाच वाजता तिकीट विक्री बंद करण्याची वेळ प्रशासनावर आली. त्यामुळे अनेक पर्यटकांना परत फिरावे लागले.

भायखळ्याच्या जिजामाता उद्यान व प्राणी संग्रहायलयात पर्यटकांनी रविवारी प्रचंड गर्दी केली. दिवसभरात ३२,८०० पर्यटकांनी भेट दिली. तिकीटविक्रीतून पालिकेला तब्बल १३ लाख ७८ हजार ७२५ रुपये इतका महसूल मिळाला. रविवारी पर्यटकांनी गर्दीचे सगळे उच्चांक मोडले. यापूर्वी ६ नोव्हेंबर रोजीच्या रविवारी ३१ हजार पर्यटकांनी भेट दिली होती व ११लाख महसूल जमा झाला होता.

cinema hall Ulhasnagar, Ulhasnagar Parking ,
उल्हासनगरात चित्रपटगृहाशेजारील रहिवाशांची कोंडी, प्रेक्षकसंख्या वाढल्याने रहिवासी क्षेत्रात पार्कींग
Bangladesh pulled plug on key internet deal with India
भारताला मोठा धक्का; बांगलादेश आणि भारताचा इंटरनेट करार…
Python Eating Deer In 12 Second Omg Video Viral Shocking video
VIDEO: चपळता हरली! १२ सेकंदात गिळलं जिवंत हरीण, अजगराची थरारक शिकार पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
Time Travel Movies On OTT
‘टाइम ट्रॅव्हल’वर आधारित चित्रपट पाहायला आवडतात? OTT वरील ‘हे’ सिनेमे पाहून डोकं चक्रावेल
Massive increase in the number of pigeons and doves Pune print news
कबुतरांचं करायचं काय?
Traffic changes due to flyover work at Katraj Chowk Confusion among people due to having to take alternative route
कात्रज चौकाची ‘कोंडी’… वाहतुकीचा बोजवारा
seagulls Sindhudurg loksatta news
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागर किनारी सिगल पक्ष्यांचे आगमन
Loksatta safarnama Cave Tourism Artwork History travel
सफरनामा: लेणी पर्यटन!

पाहा व्हिडिओ :

राणी बागेत दररोज ६ ते ७ हजार पर्यटक भेट देत असून शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची संख्या २१ हजारांपर्यंत पोहोचते. पेंग्विन नव्याने आले तेव्हा दिवसाला जास्तीत जास्त ४५ हजारापर्यंत पर्यटक आले होते. त्यानंतर एवढ्या मोठ्या संख्येने पर्यटक रविवारी आले असल्याची माहिती प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली. पाउणे पाच वाजता पर्यटकांची अलोट गर्दी झाल्यामुळे तिकीट विक्रीचे दालन गर्दीने भरून गेले आणि तिकीट विक्री बंद करावी लागली. त्यामुळे अनेक पर्यटकांचा हिरमोड झाला. मात्र इतक्या मोठ्या संख्येने पर्यटकांना कमी वेळात सामावून घेणे शक्य नसल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

करोनापूर्व काळात प्राणी संग्रहालयात केवळ पेंग्विन हेच एक आकर्षण होते. मात्र आता शक्ती, करिश्मा ही वाघाची जोडी, अस्वल, हरणे, अजगर, तरस आणि विविध प्रकारचे पक्षीही पाहायला मिळत आहेत. प्राणी संग्रहालयात सध्या नऊ पेंग्विन, दोन वाघ, शेकडो प्रकारचे पक्षी, हत्ती, हरणे, माकडे, तरस, अजगर आदी प्रकारचे १३ जातीचे ८४ सस्तन प्राणी, १९ जातींचे १५७ पक्षी आहेत. या शिवाय २८३ प्रजातींचे आणि ६६११ वृक्ष-वनस्पती आहेत. तर रंगीत करकोचा, छत्रबलाक, विविध प्रकारचे बगळे, सारस असे पाणपक्षीही आहेत.

१ जानेवारी २०२३ ची आकडेवारी

प्रत्यक्ष तिकीटविक्री …..२७,२६२

महसूल ….९,६०,७२५ रुपये

ऑनलाईन तिकीटविक्री …..५,५५८

महसूल …..४,१८,०००

एकूण पर्यटक .….३२,८२०

एकूण महसूल ……१३,७८,७२५ रुपये

Story img Loader