ट्रान्स हार्बर मार्गावरील वाहतूक आता पूर्ववत झाली आहे. आज सकाळी ठाणे -ऐरोली दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे ठाणे – वाशी, ठाणे – पनवेलदरम्यान वाहतुकीवर परिणाम झाला होता. आता या मार्गावरील बिघाड दुरुस्त करण्यात आला असून वाहतूक पूर्ववत झाली आहे. मात्र, ऐन सकाळच्या वेळीच रेल्वे मार्गावर बिघाड झाल्याने चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागला. एकाच महिन्यात दोनदा ट्रान्स हार्बरवरील वाहतूक विस्कळीत होण्याचा प्रकार घडला आहे.

 

Story img Loader