डहाणू आणि वाणगाव दरम्यान पहाटे ओव्हरहेड वायर तुटल्याने शुक्रवारी पश्चिम रेल्वेची लांब पल्ल्याची वाहतूक विस्कळीत झाली होती. यामुळे मुंबईकडे येणारी राजधानी एक्स्प्रेस तीन तास उशिरा मुंबईत पोहोचली. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास मुंबईकडे येणाऱ्या मार्गावरील ओव्हरहेड वायर अचानक तुटली आणि वाहतूक ठप्प झाली. पहाटे पाच वाजेपर्यंत वायर दुरूस्त करण्याचे काम सुरू होते. यामुळे डहाणू ते विरार दरम्यानची शटल सेवा विस्कळीत झाली. राजधानी एक्स्प्रेस, अवंतिका एक्स्प्रेस आणि गुजरात मेल या तीन तास विलंबाने मुंबईत दाखल झाल्या. मात्र याचा कोणताही परिणाम पश्चिम रेल्वेच्या उपनगरी वाहतूक सेवेवर झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

Story img Loader