मुंबई : संक्रांतीचा सण पतंग उडवून साजरा करण्याची प्रथा मुंबईत चांगलीच लोकप्रिय झाली आहे. कोण कोणाचा पतंग कापणार या खेळातली उत्कंठा पक्ष्यांच्या जीवावर बेतत आहे. दरम्यान, या पतंगबाजीने एका घुबडाला कायमचे जायबंदी केले आहे. मांजामध्ये अडकलेल्या या घुबडाचे प्राण वाचले, मात्र त्याचे उडणे कायमचे बंद झाले. यामुळे त्याच्या नशिबी आता बंदीवास आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> लोढा कुटुंबात वादाचे तडे, व्यापारचिन्हाच्या मालकीवरून भावांमध्ये न्यायालयीन संघर्ष

संक्रांत जवळ येऊ लागताच अनेक मुंबईकर पतंगा उडविण्यात मग्न होतात. पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मांजामुळे जखमी होणाऱ्या पक्ष्यांची लक्षणीय आहे. पतंग उडविण्याचा आनंद दिवसेंदिवस पक्ष्यासाठी धोक्याची घंटा ठरत आहे. काही दिवसांपूर्वी पतंगाच्या मांजामध्ये एक घुबड अडकले होते. त्याचा बचाव करण्यात आला असून, त्याच्यावर वैद्यकीय उपचारही करण्यात आले. मात्र, घुबडाच्या पंख्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे आता तो कधीच उडू शकणार नाही. त्यामुळे त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडणे शक्य नाही. त्याला पुढील आयुष्य बचाव केंद्रातच काढावे लागणार आहे. निसर्गापासून तो वंचित राहणार आहे.

हेही वाचा >>> ५ लाख कोटींचे करार, दावोस परिषदेत राज्यात विक्रमी गुंतवणुकीची चिन्हे

दरम्यान, दरवर्षी पतंग उडविण्याचा आनंद लुटत असताना मांजामुळे अनेक पक्षी जखमी होतात. यामध्ये काहींचा मृत्यूही होतो. साध्या मांजाऐवजी नायलॉन मांजांचा वापर वाढल्याने दरवर्षी शेकडो पक्षी जखमी होतात, तर काहींचा मृत्यूदेखील होतो. दरवर्षी अनेक कबुतरे, कावळे, घुबड, पोपट, घार आणि फुलपाखरे आदी त्यात बळी पडतात.

स्नायू नसांना बाधा

नायलॉन मांजामुळे पक्ष्यानचे स्नायू आणि नसांना संभाव्य धोका असतो. त्यामुळे पक्ष्यांचे पंख कापले जातात, हाडं मोडले जाते. परिणामी, पक्ष्यांना कायमचे अपंगत्व देखील येते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Owl trapped in manja rescued but its flight permanently halted mumbai print news zws