सुरक्षेसाठी वेगळ्या पाकिटात देण्याची सूचना

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

लहान मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पाकीटबंद खाद्यपदार्थामध्ये खेळणी किंवा अन्य वस्तू देण्यास मनाई असून अशा वस्तू वेगळ्या पाकिटात द्याव्यात, अशी सूचना अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने दिली आहे.

बिस्किटे, चिप्स इत्यादी खाद्यपदार्थाचा खप होण्यासाठी आकर्षण म्हणून खेळणी, स्टिकर्स किंवा तत्सम वस्तू खाद्यपदार्थाच्या पाकिटांमध्ये मोफत दिल्या जातात. या वस्तू लहान मुलांकडून खाण्याच्या पदार्थासोबत गिळल्या जाण्याची शक्यता असते. अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यानुसार, अखाद्य पदार्थाचा समावेश असलेले खाद्यपदार्थ असुरक्षित असून आरोग्यासाठी धोकादायक आहेत. लहान मुलांच्या सुरक्षेसाठी अशाप्रकारे खाद्यपदार्थामध्ये वस्तू किंवा खेळणी तत्सम अखाद्य पदार्थ देणे अयोग्य आहे. तेव्हा अशा वस्तू खाद्यपदार्थाच्या पाकिटाऐवजी अन्य वेगळ्या पाकिटांमध्ये देण्यात यावे. तसेच अशा वस्तूंचा आकार किंवा रंग हा खाद्यपदार्थाशी मिळताजुळता नसावा, असे या सूचनेमध्ये नमूद केले आहे. खाद्यपदार्थ उत्पादकांमध्ये यासंबंधी जनजागृती करण्याचे आदेश अन्न व सुरक्षा मानके प्राधिकरणाने राज्य अन्न व औषध प्रशासनाला दिले आहेत.