येत्या १ ऑगस्टपासून शहरातील सर्व पद्मिनी टॅक्सी बंद करण्यात येणार असल्याच्या बातम्या आल्यानंतर टॅक्सीचालकांपासून ते मुंबईकर यांच्या मनात संभ्रमाचे वातावरण होते. मात्र सर्व पद्मिनी टॅक्सी रस्त्यावरून पायउतार होणार नसून ज्यांचे योग्यता प्रमाणपत्र संपत आहे, अशाच टॅक्सी टप्प्याटप्प्याने सेवामुक्त होणार आहेत. त्यासाठी परिवहन विभागाने १ ऑगस्ट २०१३ ते ३१ जुलै २०१४ अशी एका वर्षांची मुदत दिली आहे. या मुदतीत एकूण ४५०० पद्मिनी गाडय़ा रद्द होतील, असे परिवहन आयुक्त व्ही. एन. मोरे यांनी स्पष्ट केले.
शहरातील सर्वच पद्मिनी टॅक्सी एकाच दिवसात हद्दपार करता येणार नाहीत. या टॅक्सींपैकी अनेक टॅक्सींना २००० किंवा त्यानंतर योग्यता प्रमाणपत्र दिले आहे. हे प्रमाणपत्र २० वर्षांसाठी वैध असते. त्यामुळे सरसकट सगळ्या पद्मिनी टॅक्सींना सेवामुक्त करणे चुकीचे ठरेल.
त्यामुळे परिवहन विभागामार्फत यंदा ४५०० टॅक्सी बाद करण्यात येणार आहेत, असे मोरे यांनी सांगितले. ३० जुलै २०१३ रोजी योग्यता प्रमाणपत्र घेण्यासाठी गेलेल्या गाडय़ांनाही एका वर्षांने हे प्रमाणपत्र वाढवून देण्यात आले आहे. त्यामुळे या गाडय़ा पुढील वर्षी ३० जुलैला बाद होतील, असेही ते म्हणाले.
सध्या मुंबईत नऊ हजार पद्मिनी टॅक्सी आहेत. या सर्व टॅक्सी एकाच वेळी बाद करता येणार नाहीत. मुंबईतून शेवटची पद्मिनी हद्दपार होण्यासाठी अजून पाच वर्षे वाट पाहावी लागेल, असे टॅक्सीमेन्स युनियनचे महासचिव ए. एल. क्वाड्रोस यांनी सांगितले.
१ ऑगस्टपासून शहरातील सर्व पद्मिनी टॅक्सी बंद
येत्या १ ऑगस्टपासून शहरातील सर्व पद्मिनी टॅक्सी बंद करण्यात येणार असल्याच्या बातम्या आल्यानंतर टॅक्सीचालकांपासून ते मुंबईकर यांच्या मनात संभ्रमाचे वातावरण होते. मात्र सर्व पद्मिनी टॅक्सी रस्त्यावरून पायउतार होणार नसून ज्यांचे योग्यता प्रमाणपत्र संपत आहे,
आणखी वाचा
First published on: 31-07-2013 at 04:25 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Padmini taxi off from august 1 in the mumbai city