शिवा गोरच्या प्रदर्शनात, भारताच्या राज्यघटनेचा सरनामा गोरमती भाषेत भाषांतरित करून भिंतीवर (अन्य कोणत्याही ‘भारतीय भाषे’त हा सरनामा असता तर तो जितक्या इतमामानं लावला असता, तितक्याच आदरानं) लावलेला दिसतो. याच भिंतीवर एक श्रवणक (हेडफोन) आहे, तो कानांना लावलात तर हा सरनामा त्यातूनही ऐकू येईल. त्यापलीकडल्या भिंतीवर मात्र निराळ्याच रंगांतला एक झेंडा दिसतो. तो कशाचा? ‘हा जगभरच्या रोमा मानवसमूहाचा झेंडा आहे’- शिवा सांगतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
रोमा म्हणजे ‘जिप्सी’. आपल्याकडले बंजारा किंवा मुस्लीम देशांतले डोमरी हे सारेच फिरते- जिप्सी- समूह. हे स्वत:ला ‘गोर’ म्हणवतात आणि इतरांना ‘कोर’ – आतला आणि बाहेरचा, एवढाच हा फरक. बाहेरच्यांचं अनुकरण जरूर करावं, पण आतलं टिकवावं, अशा पद्धतीनं हा मानवसमूह जगभर जगतो. तिथलाच होतो. त्यामुळे जगभर ही एकच जात म्हणावं, तर तसं नाही. गोरमती भाषेसारखीच रोमा भाषा. तशीच डोमरी भाषा. आणखी कुठकुठल्या देशांत रोमा/ गोर आहेत, तिथं ते आणखी निराळ्या (उदाहरणार्थ फिनलंडमध्ये ‘काले’ म्हणून) ओळखले जातात.
या समाजाची जागतिक/ भारतीय ओळख दृश्यकलेतून दाखवताना शिवा गोरची भूमिका बरीचशी संग्रहालय मांडल्यासारखी आहे की काय, असं प्रदर्शनात शिरताच बंजारा स्त्रियांचा आरशाचा रंगीबेरंगी पट्टा दिसल्यामुळे वाटू लागतं. पण तसं नाही, हे सांगण्यासाठी समोर मोठ्ठे पाइप आहेत. पाइप एकाच जागी राहावेत, म्हणून पायताणांचा अडसर केला आहे. मधोमध एका कंदिलाचा सांगाडा. ‘पायातला जोडा हलला- तो घालून कुणी चालू लागलं, की घरही स्थलांतरित होणार’ ही कल्पना शिवा गोर यांनी प्रेक्षकांपर्यंत सहजपणे पोहोचवली आहे. प्रदर्शनाच्या वरच्या मजल्यावर दोन उलटय़ा छत्र्या दिसतात, त्या ढगाचं प्रतीक आहे हे मात्र सहजपणे समजत नाही. किंवा बारदानाची पिशवी टांगली आहे ती ‘त्यात देवी असते’ म्हणून, हे तर प्रदर्शनासोबतचं इंग्रजी माहितीपत्र वाचूनच कळेल. हे ‘न कळणं’ अनुभवत, ठेचकाळत असताना जर ‘आपण आपलाच आत्ताचाच समाज, त्याच समाजाच्या जाणिवा गृहीत धरतो म्हणूनच आपल्याला कळतं!’ असं काहीतरी प्रेक्षकाला वाटलं, तर चांगलंच- कारण ती आपल्या अनुभवांचं आत्मपरीक्षण करण्याची पहिली पायरी आहे. असो. प्रदर्शनात पुढे तीन कॅनव्हासवर तीन अमूर्त चित्रांसारखं काहीतरी दिसतं.. काही क्षणांत लक्षात येतं : ‘हे तर तीन दगड! चूलच मांडलीय ही तीन दगडांची!’
शिवा गोर यांच्या या प्रदर्शनात त्यांची कल्पकता सौम्य प्रमाणात प्रकटते, तरीही बंजारा/रोमा समूहांतल्या जुन्या वस्तूंचं केवळ संग्रहालय न मांडता त्यातून समकालीन दृश्यरचना साकारण्याचा मार्ग गोर यांनी निवडला आहे. अमूर्त चित्रांसारखीच दिसणारी चित्रं करूनही त्यांचा थेट दृश्य-साधम्र्यासाठी वापर करण्याची त्यांची रीत तर प्रशंसापात्रच ठरेल. मात्र रोमा/ बंजारा समूहाच्या समकालीन जाणिवा चित्रकलेबाहेरही आहेत का, या प्रश्नाचं उत्तर हवं असल्यास ८ एप्रिलच्या शनिवापर्यंत थांबावं लागेल.. त्या दिवशी- म्हणजे या प्रदर्शनाच्या अखेरीला- दिवसा रोमा समूहातून पुढे विद्यापीठांत, संशोधन क्षेत्रात कामगिरी करणाऱ्यांचा एक परिसंवाद होणार आहे; तर संध्याकाळी एका नावाजलेल्या रोमा संगीतकाराचा कार्यक्रम आहे.
इतकं प्रयोगशील प्रदर्शन ‘क्लार्क हाऊस’मध्येच भरलेलं असणार, हे काही जणांना कळलंही असेल.. तरीही प्रदर्शनस्थळाचा पत्ता : क्लार्क हाऊस, सहकारी भांडारसमोर, श्यामाप्रसाद मुखर्जी चौक (रीगल सिनेमाजवळ) असा आहे. इमारतीच्या प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर सरळ पुढे जाऊन, डावीकडलं पहिलंच पांढरं दार बेल दाबल्यास उघडेल. आत ही दुमजली गॅलरी आहे!
सात नामवंत, छोटेखानी दालनात
मथुरादास मिल्स कम्पाऊंडमध्ये (ब्ल्यू फ्रॉग पबच्या मागे) ‘अनुपा मेहता आर्ट्स अॅडव्हायझरी’ या नावाचं दालन सुरू झालं आहे आणि तिथं सात नामवंत चित्रकारांनी कागदावर केलेल्या कलाकृतींचं प्रदर्शन येत्या शनिवारपासून (८ एप्रिल) रसिकांसाठी खुलं होत आहे. प्रभाकर बरवे, अकबर पदमसी, जोगेन चौधरी (मिश्र रंगसाधने), झरीना हाश्मी (मुद्राचित्र), अंजू दोडिया, मिठू सेन (जलरंग) आणि शिल्पकार म्हणून ओळखला जाणारा अल्वार बालासुब्रमण्यम यांची ही चित्रं आहेत. दालन लहानच, त्यामुळे एकाच वेळी सात चित्रकारांची कामं दाखवायची तर आकारावर मर्यादा आहेत.
संवाद आणि ‘सह-चित्रण’
‘आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’तर्फे त्या संस्थेच्या संस्थापक सप्ताहाचा भाग म्हणून, सध्याच्या ‘स्टडी सर्कल’ सदस्यांच्या कलाकृतींचं प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीजवळच्या (पहिला मजला, अडोर हाऊस, कैखुश्रू दुभाष मार्ग- रॅम्पार्ट रो) ‘आर्टिस्ट्स सेंटर’मध्ये भरवण्यात आलं आहे.. वैशिष्टय़ म्हणजे इथं नव्या कलावंतांना मार्गदर्शनपर अशी व्याख्यानंही होणार आहेत. उद्याच्या शुक्रवारी (७ एप्रिल) निखिल पुरोहित आणि महेंद्र दामले हे कलाशिक्षण-क्षेत्रात प्रयोग करणारे दोघे जण ‘वसाहतोत्तर काळातील प्रतिमासृष्टीचे अर्थ’ या विषयावर संवाद साधतील, तर शनिवारी कलासमीक्षक आणि ‘लोकप्रभा’चे संपादक विनायक परब हे ‘दृश्यकलेतील विपणनतंत्र’ या विषयावर बोलतील. ही दोन्ही संवाद-सत्रं दुपारी चारपासून सुरू होणार आहेत. रविवारी (८ एप्रिल) विजय आचरेकर आणि मनोजकुमार सकळे हे दोघेही एकाच मोठय़ा कॅनव्हासवर आणि एकाच मध्यवर्ती कल्पनेवर चित्रण करणार आहेत.