‘फेसबुक अटक’प्रकरणी दोन पोलीस अधिकाऱ्यांवर करण्यात आलेल्या निलंबनाच्या कारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेने पुकारलेल्या ‘पालघर बंद’ला बुधवारी चांगला प्रतिसाद मिळाला. पालघर शहरासह अनेक प्रमुख भागांत रिक्षा व खासगी प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद होती. तर महानगरदंडाधिकारी बागडे यांच्या बदलीविरोधात वकिलांच्या संघटनेने आंदोलन केल्याने न्यायालयाचे कामकाजही विस्कळीत झाले.
बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यसंस्काराच्या दिवशी राज्यभर पाळण्यात आलेल्या बंदच्या विरोधात फेसबुकवर प्रतिक्रिया नोंदवणाऱ्या दोन तरुणींना पालघर पोलिसांनी अटक केली होती. त्याचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर पालघरचे पोलीस अधीक्षक सेनगावकर व पोलीस निरीक्षक पिंगळे यांना निलंबित करण्यात आले होते. तसेच पालघरचे महानगरदंडाधिकारी रामचंद्र बागडे यांचीही जळगाव येथे बदली करण्यात आली होती. याचा निषेध करण्यासाठी शिवसेनेने बुधवारी ‘पालघर बंद’चे आवाहन केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. रिक्षा व खासगी प्रवासी वाहतूक बंद असल्याने रस्त्यांवर शुकशुकाट होता. एसटीची वाहतूकही तुरळक दिसत होती. बंदच्या काळात संपूर्ण तालुक्यात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र, काही ठिकाणी शिवसैनिकांनी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या प्रतीकात्मक पुतळय़ाचे दहन केले. सेनेचे प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी बंदचे समर्थन केले तर वेळोवेळी पोलिसांच्या कारवाईचा निषेध करणाऱ्या सेनेने आपल्या सोयीनुसार आता पोलिसांना पाठिंबा दिला असल्याचा टोला माणिकराव ठाकरे यांनी लगावला आहे.
पालघर बंद कडकडीत!
‘फेसबुक अटक’प्रकरणी दोन पोलीस अधिकाऱ्यांवर करण्यात आलेल्या निलंबनाच्या कारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेने पुकारलेल्या ‘पालघर बंद’ला बुधवारी चांगला प्रतिसाद मिळाला. पालघर शहरासह अनेक प्रमुख भागांत रिक्षा व खासगी प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद होती. तर महानगरदंडाधिकारी बागडे यांच्या बदलीविरोधात वकिलांच्या संघटनेने आंदोलन केल्याने न्यायालयाचे कामकाजही विस्कळीत झाले.
First published on: 29-11-2012 at 04:41 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Palgarh crisp closed