कार्यकर्त्यांच्या सळसळत्या उत्साहात रवींद्र नाटय़ मंदिर येथे पारितोषिक वितरण सोहळा संपन्न
मुंबई : भारतासह परदेशातील नागरिकांनाही मुंबईचा गणेशोत्सव दरवर्षी खुणावत असतो. हा गणेशोत्सव यशस्वी करण्यासाठी आणि एका वेगळय़ा उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांचा तसेच मूर्तिकारांपासून कला दिग्दर्शकांचा यथोचित सन्मान ‘लोकसत्ता गणेश उत्सव मूर्ती स्पर्धे’च्या माध्यमातून दरवर्षी करण्यात येतो. त्यामुळे यंदा ‘मुंबईचा राजा’ कोण होणार, याबाबतची दिवसांगणिक वाढत गेलेली उत्कंठा अखेर सोमवारी संपली. करी रोड पश्चिमेकडील पंचगंगा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला ‘मुंबईचा राजा’ हा बहुमान आणि ५१,००१ रुपये, मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
हेही वाचा >>> मानसिक आरोग्य उपचारांसाठी महानगरपालिकेच्या दवाखान्यांचा आधार; दोन हजार ४७१ जणांनी घेतले उपचार
गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरणाशी असलेली बांधिलकी जपत अनेक मंडळे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करीत असतात. यंदा ठाणे येथील पोलीस मुख्यालय, प्राथमिक शाळा श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला ‘पर्यावरणस्नेही मंडळ’ आणि ९,००१ रुपये, मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तर, तुर्भे येथील शिव छाया मित्र मंडळ ‘वाचकांची पसंती’ पुरस्काराचे मानकरी ठरले.
‘लोकसत्ता गणेश उत्सव मूर्ती स्पर्धा २०२३’चा पारितोषिक वितरण सोहळा सोमवारी सायंकाळी प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिर येथे पार पडला.
जीवनगाणी निर्मित ‘प्रथम नमन गणराया’ या विशेष कार्यक्रमाने पारितोषिक वितरण सोहळय़ाची संध्याकाळ बहारदार गाणी आणि रंगीबेरंगी नृत्याविष्काराने सजली होती. प्रसिद्ध निवेदक कुणाल रेगे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कमधील समर्थ व्यायाम मंदिरच्या खेळाडूंनी मल्लखांबची प्रात्यक्षिके सादर करीत उपस्थितांना थक्क केले. समर्थ व्यायाम मंदिरचे उदय देशपांडे उपस्थित होते.
हेही वाचा >>> फडणवीस यांचा व्हिडीओ दाखवत पनवेल, मुलुंड टोलनाक्यांवर मनसे कार्यकर्त्यांचे टोल न भरण्याचे वाहन चालकांना आवाहन
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नंदकुमार गुरव आणि संजय भुस्कुटे, पी सी चंद्रा ज्वेलर्सचे प्रसेनजित डे, ‘एल टी के इंडस्ट्रीज प्रा. लि.’चे (माचो हिंट) अजय नार्वेकर, ‘किक इव्ही’चे सागर जोशी, वैभवलक्ष्मी बिल्डर्स आणि डेव्हलपर्सचे डॉ. रामदास सांगळे, तन्वी हर्बलचे प्रतीक पै, प्रसिद्ध यूटय़ब स्टार तुषार खैर तसेच ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर, केदार वाळिंबे आणि संदीप बुद्धिराजा यांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानित करण्यात आले.
लोकसत्ता गणेश उत्सव मूर्ती स्पर्धा २०२३ : अंतिम फेरी निकाल
भव्य पारितोषिक : मुंबईचा राजा बहुमानाचे मानकरी
(रु. ५१,००१ /- रोख,
मानचिन्ह व सन्मानपत्र)
पंचगंगा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, करी रोड (पश्चिम)
* विशेष पारितोषिक : पर्यावरणस्नेही मंडळ
(रु. ९,९९९ /- रोख,
मानचिन्ह व सन्मानपत्र)
पोलीस मुख्यालय, प्राथमिक शाळा श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, ठाणे
* वाचकांची पसंती
शिव छाया मित्र मंडळ, तुर्भे
विभागवार प्रथम पारितोषिक
(रु. ९,९९९ /- रोख,
मानचिन्ह व सन्मानपत्र)
* विभाग : कुलाबा ते अंधेरी :
बालगोपाळ मित्र मंडळ,
(मुंबईचा पेशवा), विलेपार्ले (पूर्व)
* विभाग : जोगेश्वरी ते दहिसर :
गोकुळ नगर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ, दहिसर
* विभाग : सीएसएमटी ते कुर्ला:
पंचगंगा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, करी रोड (पश्चिम)
* विभाग : विद्याविहार ते मुलुंड
बर्वे नगर अखिल भटवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, घाटकोपर (पश्चिम)
* विभाग : ठाणे शहर :
एकवीरा मित्र मंडळ, ठाणे
* विभाग : डोंबिवली – कल्याण:
बालाजी आंगण सोसायटी मंडळ, ठाकुर्ली (पूर्व)
* विभाग : नवी मुंबई विभाग
नवयुग उत्सव मित्र मंडळ, (एलआयजीचा राजा), नेरूळ
सर्वोत्कृष्ट संहिता लेखन
(रु. २,००१ /- रोख,
मानचिन्ह व सन्मानपत्र)
* विभाग : कुलाबा ते अंधेरी :
संजय गुरव : साईराज गणेशोत्सव मंडळ, विलेपार्ले (पूर्व )
* विभाग : जोगेश्वरी ते दहिसर :
महेश गवाणकर : गणेश मंडळ रहिवाशी सेवा संघ, जोगेश्वरी (पूर्व)
* विभाग : सीएसएमटी ते कुर्ला :
स्नेहा विजय कदम : श्री हनुमान सेवा मंडळ, धारावी
* विभाग : विद्याविहार ते मुलुंड :
मंडळाचे कार्यकर्ते : रायगड चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, घाटकोपर (पूर्व)
* विभाग : ठाणे शहर :
प्रशांत सुतार, हेमंत खारकर : शिवसम्राट मित्र मंडळ, ठाणे
* विभाग : डोंबिवली – कल्याण :
मंगेश नारकर : अष्टविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, डोंबिवली (पश्चिम)
* विभाग : नवी मुंबई विभाग :
विजय कदम : वाशीचा विघ्नहर्ता सेक्टर ४-५ सार्वजनिक गणेशोत्सव, वाशी
सर्वोत्कृष्ट मूर्तीकार
* विभाग : कुलाबा ते अंधेरी :
अजित कोरगावकर :
श्री बाल गणेशोत्सव ,
भाजी गल्ली, ग्रँट रोड
* विभाग : जोगेश्वरी ते दहिसर :
संदीप गजकोष : नवतरुण मित्र मंडळ, दहिसर (पूर्व )
* विभाग : सीएसएमटी ते कुर्ला :
गणेश चव्हाण : ताराबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, माझगाव
* विभाग : विद्याविहार ते मुलुंड :
निलेश माने : शिवशक्ती सार्वजनिक गणेशोत्सव
(कांजुरचा राजा), कांजूरमार्ग (पूर्व)
* विभाग : ठाणे शहर :
दीपक गोरे : कोलबाड मित्र मंडळ, ठाणे
* विभाग : डोंबिवली – कल्याण :
सुनील कल्याणकर : जोशी मित्र मंडळ, देवीचौक, डोंबिवली (पूर्व )
* विभाग : नवी मुंबई विभाग :
दीपिका म्हात्रे : सीवूड्सचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव, सीवूड्स
सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक
(रु. २,००१ /- रोख,
मानचिन्ह व सन्मानपत्र)
* विभाग : कुलाबा ते अंधेरी :
नरेश मिस्त्री : स्वप्नाक्षय मित्र मंडळ, अंधेरी (पश्चिम)
* विभाग : जोगेश्वरी ते दहिसर :
रेश्मा शिंदे : विघ्नहर्ता रहिवाशी मित्र मंडळ, बोरिवली (पूर्व)
* विभाग : सीएसएमटी ते कुर्ला :
प्रदीप पंडित : पांगेरी चाळ, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, भायखळा
* विभाग : विद्याविहार ते मुलुंड :
स्वप्नील सामंत : बालमित्र कला मंडळ ( विक्रोळीचा मोरया) विक्रोळी (पश्चिम)
* विभाग : ठाणे शहर :
सुधीर कडू : शिवगर्जना मित्र मंडळ, ठाणे
* विभाग : डोंबिवली – कल्याण :
मंडळाचे कार्यकर्ते : शिवप्रेमी सार्वजनिक उत्सव मंडळ, कल्याण (पश्चिम)
* विभाग : नवी मुंबई विभाग :
राम कदम : शिव छाया मित्र मंडळ, तुर्भे
सर्वोत्कृष्ट देखावा
(रु. २,००१ /- रोख,
मानचिन्ह व सन्मानपत्र)
* विभाग : कुलाबा ते अंधेरी :
धसवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, गिरगाव
* विभाग : जोगेश्वरी ते दहिसर :
भावदेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, दहिसर (पश्चिम)
* विभाग : सीएसएमटी ते कुर्ला :
इलेवन एविल्स क्रिकेट क्लब सार्व. गणेशोत्सव मंडळ, धारावी
* विभाग : विद्याविहार ते मुलुंड :
विकास मंडळ, भांडुप (पश्चिम)
* विभाग : ठाणे शहर :
शिव चैतन्य मित्र मंडळ, वागळे इस्टेट, ठाणे
* विभाग : डोंबिवली – कल्याण :
लोकग्राम गणेशोत्सव मंडळ, लोकग्राम, कल्याण (पूर्व)
* विभाग : नवी मुंबई विभाग : नवसाला पावणारा महाराजा (एसजीयूएम सेक्टर १७) वाशी