आमदार पंकज भुजबळ यांनी अटकपूर्व जामिनासाठी अलिबाग येथील जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल एका फसवणुकीच्या प्रकरणात ते सहआरोपी आहेत. भुजबळ यांच्या वतीने फौजदारी वकील विलास नाईक यांनी हा अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला असून येत्या बुधवारी यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
पनवेल तालुक्यातील रोिहजण येथील २५ एकर जागेत २३४४ निवासी घरे बांधण्याचा प्रकल्प देवीशा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीतर्फे सुरू करण्यात आला आहे. त्यात गुंतवणूकदारांची ४४ कोटींची फसवणूक झाली असल्याची फिर्याद मोहमद युनूस शेख यांनी १३ जून २०१५ रोजी केली होती. आíथक गुन्हे शाखेने तपास करून पनवेल न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.
First published on: 19-04-2016 at 03:50 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pankaj bhujbal in court for bail